लाल महालात लावणी सादर करणाऱ्या वैष्णवीवर गुन्हा दाखल

Update: 2022-05-21 11:22 GMT

पुणे येथील ऐतिहासिक अशा लाल महालात लावणीवर डान्स शूट करण्यात आल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. वैष्णवी पाटील या तरुणीने एका लावणीवर रिल्सचं शुटिंग लाल महालात केले होते. पण त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडसह अनेक शिवप्रेमींनी यावर आक्षेप घेतला. तसेच पोलिसात देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी वैष्णवी वर गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवीने मागितली माफी

यानंतर मात्र हा व्हिडिओ बनवणाऱ्या वैष्णवी पाटील आणि कुलदीप बापट यांनी जाहीर माफी मागितली आहे. या दोघांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एका व्हिडिओद्वारे माफी मागितली आहे. लालमहालामध्ये लावणीचा व्हिडीओ शूट करणं ही आपली चूक होती, त्यामुळे आपण सगळ्यांची माफी मागतो, असे तिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

आपण काही दिवसांपूर्वी जिजाऊंच्या लाल महालात एका लावणीवर डान्सचा व्हिडीओ शूट केला होता. पण यामुळे वाद निर्माण होईल असे आपल्याला लक्षा आले नाही. एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ आपण बनवला होता, पण कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तसेच आपण तो व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन डिलीट केल्याचे तिने सांगितले आहे.

Tags:    

Similar News