मासिक पाळीच्या त्रासामुळे 14 वर्षीय मुलीनं आयुष्यच संपवलं
घटनेत एका 14 वर्षीय मुलीने मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. काय आहे ?प्रकरण जाणून घ्या !
एका ठराविक वयानंतर प्रत्येक महिलेला मासिक पाळी येते. या काळात काही महिलांना भरपूर त्रास होतो, जो सहन होत नाही. तर, काही महिलांना काहीसा कमी त्रास होतो. मात्र, अनेकदा पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर मुली घाबरतात. याबद्दल फार माहिती नसल्याने कधीकधी त्यांचे काही गैरसमजही होतात. मात्र, एका 14 वर्षाच्या मुलीने मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून जे केलं, ते जाणून तुम्ही हादरून जाल. ही घटना माला़डमधून समोर आली आहे.
मंगळवारी संध्याकाळी घरात कोणीच नसताना तिने घरातीलच एका लोखंडी सळीला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. हे बघताच आई-वडिलांना धक्का बसला. त्यांनी ताबडतोब मुलीला जवळच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेत एका 14 वर्षीय मुलीने मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. तिने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी ही घटना घडली असून मालवणी पोलिसांनी नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 14 वर्षीय मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. ती आपल्या आई-वडिलांसोबत मालवणी येथील खारोडी परिसरात राहात होती. पाळीदरम्यान तिला भरपूर त्रास होत होता. यामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
मुलीच्या पालकांचा जबाब घेण्यात आला आहे. मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. पाळीचा तिला भरपूर त्रास होत होता. यामुळे ती मानसिक नैराश्यात गेली होती. याच नैराश्यातून तिने टोकाचं पाऊल उचललं. मात्र, तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकही हादरले आहेत.