धुळ्यात ९२ वर्षाच्या आजीबाई वनिता पटेलांनी केले मतदान

Update: 2024-05-20 13:43 GMT

धुळे शहरात सकाळपासून मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहायला मिळत असून ९२ वर्षीय वनिताबेन पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला ९२ वर्ष आजींकडे पाहून मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे असे अवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून सर्व मतदार बांधवांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं अवाहन केलं जात आहे. त्याचा प्रत्यय आज प्रत्यक्षात बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा अधिकार बजावत आहेत .

तसेच त्यामध्ये नवतरुण मतदारांची संख्या देखील विशेष असून वृद्ध मतदार देखील मागे नाहीत. ९२ वर्षाच्या वनिता बेन पटेल आजीबाईदेखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आपल्या मुलासोबत मतदान केंद्रावर आल्या होत्या. तसेच यावेळी त्यांच्या मुलाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमच्या आई वनिता बेन पटेल या ९२ वर्षाच्या असून त्यांनी या वयात आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

त्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन धुळे मतदार संघातील बंधु आणि भगिनींनी जास्तीत जास्त मतदान करावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Tags:    

Similar News