धक्कादायक! ७२ वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांच्या पतीचं कोरोनाने निधन

पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायाने धावल्याने आल्या होत्या चर्चेत...

Update: 2021-05-06 04:30 GMT

पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर चर्चेत आलेल्या लता करे यांच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. लता करे यांचे पती कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.

२०१३ मध्ये लता करे प्रथम पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या. वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता त्यावेळी प्रथम क्रमांक सुद्धा मिळवला होता. त्यामुळं त्यांचं त्यावेळी कौतुक ही झालं होतं.

त्यानंतर पुढेही सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली.मात्र हृदयविकारातुन पतीला वाचवणाऱ्या लता कोरोनापासुन त्यांना त्या वाचवू शकल्या नाही.




 


लता यांच्या पतीच्या निधनाच्या बातमीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त करत, लता करे यांचे पती भगवान करे यांचे निधन झाले. ही अतिशय दुःखद घटना असून त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या कठीण काळात आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत असल्याचं म्हणत, सांत्वन केलं.


Tags:    

Similar News