मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 60 किलोचा मोदक अर्पण!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर येथे 60 किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला.

Update: 2024-02-08 10:45 GMT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर येथे 60 किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला.

शिवसेना पुणे शहर आणि जिल्ह्याच्या वतीने मोदक अर्पण आणि महाआरतीचे आयोजन केले होते दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या समारंभास उपस्थित होत्या. मोदक अर्पण आणि महाआरतीनंतर डॉ. नीलम गोऱ्हे, प्रमोद भानगिरे, रमेश कोंडे आणि पदाधिकारी यांनी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली.

महाआरती झाल्यावर डॉ निलम गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणतात "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास महाआरती करून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला यश मिळावे आणि जास्तीत जास्त खासदार, आमदार निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होवो अशी प्रार्थना केली." असं डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,

या महाआरतीमध्ये मिळालेले श्रीफल ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अर्पण करण्यात येणार आहे. अशी ही माहिती निळं गोरे यांनी दिली.

शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला आघाडीच्या पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत आदी मान्यवरांसोबतच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:    

Similar News