राज्यात काल 3 हजार 710 रुग्ण कोरोनामुक्त तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83टक्के
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून काल दिवसभरात 4 हजार 796 नवीन कोरोनाबधितांची नोंद.;
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. राज्यात आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. सरकार अनेक निर्बंधात शकतीलता आणत आहे. काल मंगळवार राज्यात नवीन 4 हजार 796 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 3 हजार 710 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 130 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.
आजपर्यंत एकूण 61 लाख 89 हजार 933 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के एवढे आहे. राज्यात दुसरी लाट आता कमी होताना दिसत असली तरी अजूनही नवीन कोरणा बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. पण दिलासादायक बातमी अशी की दररोज कोरोनातुन मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.