मुंबई महापालिकेच्या 'ई' विभागाने दिलेल्या माहितीनुसार भायखळा जेलमधील 44 महिला कैद्यांना कोरोना झाला असून त्यांच्यातील एका गर्भवती महिलेवर फोर्टमधील कामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनतर भायखळा जेलमधील महिलांच्या आरोग्याच्या प्रश्न पुन्ह एकदा उपस्थित होत आहे.
लागण झालेल्या महिलांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून त्यांची व्यवस्था जेलच्या बाजूला असलेल्या ई. एस. पाटणवाला शाळेतील कोरोना क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, या कैद्यांच्या चार मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
नुकतेच भायखळा मध्यवर्ती तुरुंगात कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी एका महिलेला ताप आल्याचे आढळले. त्यानंतर 17 सप्टेंबरला महापालिकेने तिथे चाचणी केली असता त्यातील तीन महिलांना कोरोना झाल्याचे आढळले. यातील एक महिला गर्भवती होती. तिला कामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांनतर महापालिकेने तुरुंगात 18 तारखेला आरोग्य शिबीर घेत 97 जणांची चाचणी केली. त्यात 36 महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. 19 तारखेला आणखी 250 महिलांची चाचणी केली असता त्यात 4 महिला पॉझिटिव्ह सापडल्या.