- 'अशी ही बनवा बनवी' चे हे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनावर करतात 'राज'...
'अशी ही बनावा बनवी' चित्रपटातील डायलॉग आजही अनेकांच्या ओठांवर असतात. परवा या चिञपटास 33 वर्ष पूर्ण झाली. त्या निमीत्ताने शितल तारा यांनी चित्रपटातील जे गाजलेले जे डायलॉग होते त्यांचे सुलेखन ( कॅलिग्राफी) केले आहे. या भन्नाट कॅलिग्राफीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.;
जसा काळ बदलतो तशा अनेक जुन्या गोष्टी ह्या मागे पडतात. नवीन काहीतरी गोष्टी येत राहतात व जुन्या गोष्टी लोक विसरून जातात. पण अशा काही कलाकृती आहेत ज्या अनेक वर्षे लोटली तरीही लोकांच्या मनावर त्याची छाप आजही अगदी जशीच्या तशी आहे. याचे एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे 30 वर्षापूर्वी बनवलेला 'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट. 33 वर्ष्यात अनेक चित्रपट आले, गाणी आली पण ह्या चित्रपटाची जी क्रेज आहे ती तीन दशकांनंतरही कायम आहे. सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा सहभाग होता. या चित्रपटातील जी विनोद शैली व यातले जे विनोदी संवाद होते ते आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहे.
या चित्रपटातील जे काही लोकप्रिय डायलॉग होते त्या डायलॉगचे शितल तारा यांनी तीस वर्षानंतर सुलेखन केला आहे. शितल तारा या सुलेखन (कॅलिग्राफी आर्टिस्ट) आहेत. कॅलिग्राफी करून त्या वेगवेगळ्या विषयांवर विनोदी व क्रिएटिव्ह पोस्ट लिहीत असतात. सध्या त्यांनी केलेल्या कॅलिग्राफीची चर्चा सर्वत्र जोरात आहे. 23 तारखेला 'अशी ही बनावा बनवी' या चिञपटास 33 वर्ष पूर्ण झाली. त्या निमीत्ताने शितल यांनी चित्रपटातील जे गाजलेले जे डायलॉग होते त्यांचे त्यांनी सुलेखन केले आहे.
३३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ब्लॉकबस्टर अशी ही बनवाबनवी चित्रपट प्रदर्शित झाला. तीन दशकानंतर ही त्याची क्रेझ कायम आहे. या चित्रपटाचे शीर्षक आणि निवडक लोकप्रिय संवादाचे सुलेखन मी केले आहे.#अशीहीबनवाबनवी pic.twitter.com/5adTFUXp5F
— Sheetaltara (@Sheetaltara) September 23, 2021
हा माझा बायको पार्वती
तुम्ही दिलेले ७० रुपये सुद्धा वारले
धनंजय माने इथेच राहतात का?
आमच्या शेजारी राहते नवऱ्याने टाकलंय तिला...
लिंबू कलरची साडी
लिंबाचं नाव जरी घेतलं तरी माझ्या तोंडाला नळासारखी धार लागते
माझं पाकीट अशक्त आहे
कमावता असला तरी आता गमावता आहे
सारखं सारखं त्याच झाडावर काय
हा शुद्ध हलकटपणा आहे माने!
तुम्ही इतके हरामखोर असाल असं वाटलं नव्हतं
विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते
मॅडम ला सांगा मी बायकांच्या गराड्यात आहे
जरा विचित्रच आहे हे ...पण फार काळ नाही टिकायच