यापेक्षा किळसवाणं काहीच नाही, अल्पवयीन विद्यार्थ्यानं शुट केला शिक्षिकेचा व्हिडीओ...

पुण्यात अल्पवयीन मुलाने शिक्षिकेचाच व्हिडीओ चित्रीत केल्याची घटना घडली आहे.;

Update: 2022-04-01 09:24 GMT

 पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अतिशय किळसवाणी घटना घडली आहे. घरात शिकवणी शिकवायला आलेल्या ५६ वर्षीय शिक्षिकेचा व्हिडियो अल्पयीन विद्यार्थ्याने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे.


१६ वर्षाच्या अल्पयीन विद्यार्थ्याने आपल्याच घरातील वॉशरूम मध्ये मोबाईल ठेवून शिक्षिकेचे नैसर्गिक विधी करत असतानाच व्हिडयो आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे. शिक्षिकेचा विडियो रेकॉर्ड करण्यासाठी विद्यार्थ्याने आपल्या वॉश रूम मध्ये मोबाईल फोन लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. तसेच शिक्षिका विद्यार्थ्याला घरी शिकवत असताना अल्पयीन विद्यार्थ्याने शिक्षिकेचा छातीचा विडियो आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचं पिडीत शिक्षिकेने आपल्या फिर्यादीत लिहिलं आहे.


पुणेया प्रकरणी एका ५६ वर्षीय पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुला विरोधात विनयभंग आणि आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकूणच खळबळ उडाली आहे.

Full View

Tags:    

Similar News