शहीद वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख, पतीला वनसेवेत घेणार ,मुख्यमंत्र्यांची घोषणा

Update: 2021-11-22 02:27 GMT

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये वाघाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांत्वन केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्यासह त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेसाठी तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ढुमणे यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.

Tags:    

Similar News