राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता हिंगोली जिल्ह्यात संतापजनक प्रकार समोर आला आहे. हिंगोलीतील 12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केला आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव शिवारातील ही घटना घडली. पीडित 12 वर्षीय मुलगा अल्पवयीन, अंध आदिवासी तसेच दिव्यांग आहे. विशेष म्हणजे आरोपीला याची कल्पना असतानाही त्याने लाला शेतात नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.