नवीन साल चालू होताच जानेवारी महिन्या मध्ये येणारा हा संक्रांतीचा हळदीकुंकू चा सण. लहानपणापासूनच संक्रांतीचे हळदीकुंकू आपल्याला माहीतच आहे. हळदीकुंकू म्हटलं की नटणे मुरडणे एकमेकींना एकमेकींना कुंकू लावून ववसा घेणे, इच्छेनुसार वस्तू लुटणे, ओटी भरणे अशा विविध प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार आपण पाहिल्या आहेत. हे संक्रांतीचे हळदीकुंकू संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतं. सौभाग्यवती स्त्रिया हे हळदीकुंकू यापैकी कोणत्याही दिवशी करतात. आपले भारतीय सण हे बरच काही आपल्याला शिकवून जातात या सणांचा एक मुख्य हेतू सगळ्यांनी एकत्र येणं आणि आनंदानं एकमेकांबरोबर थोडा वेळ घालवणे हेच असतं नाही का! मग या अश्या आनंदाच्या सोहळ्यात #PUWO मागे राहणार आहे का! प्रिती नेहमीच एक सो एक event करत असते. Enjoyment तर असतेच पण आपण ज्या समजा मध्ये राहतो त्याच काहीतरी देण लागतो याची जाणीव ठेऊन ती बरेच सामाजिक उपक्रमही करत असते, आम्हाला सोबत घेऊन. संक्रांतीची हळदीकुंकू समाजाने जणू ठरूनच टाकाल आहे की हा अधिकार फक्त सौभाग्यवती स्त्रियांचा. त्यामुळे अश्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात विधवा, तृतीयपंथी यांना खूप दुखावलेल्या घटनांना सामोरे जावे लागते. त्यांचा अशावेळी विचारही केला जात नाही. पण हे कुठे तरी थांबायला हव. हल्ली याबाबत थोडेसे विचार बदलू लागले आहेत. आणि अर्थातच या अश्या समाजीक कार्यात PUWO नेहमीच खारीचा वाटा उचलत असते.
म्हणुनच मागच्या वर्षी आम्ही PUWO च संक्रांतीच हळदीकुंकू मातोश्री आश्रमात साजर केल. अवर्णनीय अनुभव होता तो. अर्थात या वर्षी देखील प्रितीने तृतीयपंथी स्त्रियांन बरोबर हळदीकुंकू करायच अस ठरवल. नेहमीप्रमाणे उत्तम अस नियोजन Priti n team ने केल. 26 जानेवारी या दिवशी cummins hall इथे या आगळ्या वेगळ्या हळदीकुंकू च्या कार्यक्रमाचे नियोजन केले. मी खूप excited होते. माझी तब्येत नेमकी बरी नव्हती. पण मला कार्यक्रमला जायचेच होते. थोडासा उशीरच झाला मला तिथे पोहोचायला पण कार्यक्रम चालू झाला नव्हता. सगळ्या जणी छान गप्पा मारत होत्या. थोड्याच वेळा मध्ये सोनाली ताई, चांदणी ताई आणि त्यांच्या अजून मैत्रिणी परिवार आला. आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. चांदणी ताई नी त्याच्याबद्दल आम्हाला माहिती दिली. माणूस म्हणून जगण्यार्या आपल्या जणू एक सणसणीत चपराकच दिली त्यांच्या बोलण्याने. लाजिरवाणं वाटलं मला. माणुसकीच्या गप्पा मारणारे आपण त्यांच्या विचारा पुढे अगदीच काजवा ठरलो. त्यांची जिद्द, धडपड फक्त त्यांच्या साठी नाही normal म्हणुन घेणार्या आपल्या मुलांना गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण सुद्धा त्या देतात. केव्हढी ती वैचारीक प्रगल्भता. त्यानंतर सोनाली ताई बोलल्या बापरे काय तो कॉन्फिडन्स लाजवाब. मराठी, हिंदी, इंग्लिश तीनही भाषेत अश्या बोलत होत्या की जणू सरस्वती माता उद्गारत होती. आपण स्त्रिया नुसत्याच आपले अधिकार याव अन ट्याव असे वाद घालतो. पण मी सोनाली ताई ना ऐकले आणि आपण किती पाण्यात आहोत हे जाणवले. जन्मतः स्त्रीत्व लाभून देखील आपण आपली शक्ति ओळखलीच नाही. आणि त्या स्त्री असण्यावरचं प्रेम करतात. अर्थात हा लढा या त्या कोणासाठीच वाटतो तेव्हढा सोप्पा नव्हता खूप खडतर प्रवास केला आहे त्यांनी.
मनापासुन धन्यवाद प्रिती पूनम आणि मनाली. हा असा सोहळा पाहून हळदीकुंकू या सणाचा खरा अर्थ कळाला. उपेक्षित ठेवल्या जाणार्या या तृतीयपंथी किती श्रेष्ठ आहेत, प्रेम आणि आपले पाणासाठी त्याही भुकेलेल्या आहेत, हे पाहून मन भरून आले. हे रस्त्यावर फिरतात टाळ्या वाजतात, नाचतात, शरीर विक्री करतात याची लाज आपल्याला वाटायला हवी. त्यांना त्यांची हक्काची अशी जागा समाजात मिळायलाच हवी. यासाठी त्या शंभर पावले पुढे यायला तयार आहेत, आपण एक पाऊल उचलू.
तळटीप : माझ्या PUWO मैत्रिणींनो मला एक खंत जाणवली, तुमची उपस्थिती. मला मान्य आहे रविवार फॅमिली टाइम. पण रविवार प्रत्येक आठवड्यात असतोच. हा असा उपक्रम तिथे उपस्थित राहूनच अनुभवता येतो. प्रिती आपल्यासाठी खूप वेगवेगळे event's प्लॅन करत असते. मैत्रिणींनो थांबत तर काहीच नाही गं, पण जगण्याचा खरा अर्थ सहजच उलघडून जातो.
-साची खेर