सरकार कोवीड सेंटरमधील महिलांसाठी ठोस उपाययोजना का करीत नाही? तृप्ती देसाई यांचा संतप्त सवाल
पुण्यातल्या कोव्हिड सेंटरमधून गेल्या 27 दिवसांपासून 33 वर्षीय युवती बेपत्ता आहे. या संदर्भात बोलताना भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या की, “जम्बो कोव्हिड सेंटर मधून 33 वर्षीय प्रिया गायकवाड नावाची महिला गायब होते. ती पुण्यातील शिवाजीनगर कोवाड सेंटर मध्ये ऍडमिट नव्हती अशी उडवाउडवीची उत्तर तेथील प्रशासनाकडून दिली जातात तिचे आई-वडील उपोषणाला बसतात. ही धक्कादायक बाब असून राज्य सरकार महिलांसाठी कोवीड सेंटरमध्ये ठोस उपाययोजना का करीत नाही?” असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका ३३ वर्षीय महिलेला कुटुंबीयांनी शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये २९ ऑगस्ट रोजी दाखल केले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना १५ दिवसांनी या, असे कोविड सेंटरकडून सांगण्यात आले. मुलगी बरी झाली असेल असे समजून तिला घरी घेऊन जाण्यासाठी तिची आई रागिणी गमरे या कोविड सेंटरमध्ये गेल्या असता “तुमची मुलगी येथे दाखल नव्हती’ अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. तर प्रशासनाने महिलेस कोविड सेंटरमधून ५ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिल्याचे सांगितले आहे.