‘टिक टॉक वाली लव्ह स्टोरी’ इथे लग्न जुळतं

Update: 2020-09-21 16:17 GMT

“तो माझ्याशी कधीच खोटं बोलला नाही. उलट म्हणाला मी तुझ्यासोबत नाही, तुला पाहुन आनंदी आहे. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत मी आजारी पडले आणि मला कँसर असल्याचं कळलं..” तीनं त्याला लगेच कॉल केला म्हणाली, “माझं ऑपरेशन आहे. मी किती दिवस जगेल माहिती नाही. पण जर जगले तर एक दिवस येऊन तुला नक्की भेटेन....”

वाचायला कसं सगळं एकदम फिल्मी वाटतंय ना? पण हे कोणत्या सिनेमातले डायलॉग नसुन वर्ध्यातली टीकटॉकवाली लव्ह स्टोरी आहे.

मध्यप्रदेशात राहणाऱ्या अनिताला वर्ध्याच्या अक्षयचे टिक टॉकवरचे व्हिडिओ आवडायचे. मग एकमेकांना रिक्वेस्ट पाठवणे. चॅटिंग सुरू झालं. असंच बोलता बोलता अक्षयने तिला म्हटलं “मी तुझ्या सोबत नाही, तुला बघून खुष आहे.” त्याच्या या वाक्यावर अनित त्याच्या प्रेमात पडली.

टिक टॉकवालं हे प्रेम बहरत गेलं, त्या दोघांच्या या लाँग डिस्टंस रिलेशनला दीड वर्ष उलटलं. या दिड वर्षात त्यांची एकदाही एकमेकांना प्रत्यक्षात पाहिलेलं नव्हतं. फक्त व्हिडीओ कॉलवर एकमेकांना बघणं हिच त्यांची भेट.

सर्व सुरळीत असताना अचानक अनिताची तब्बेत बिघडली. तिला रुग्णालयात अॅडमीट करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगीतलं तिला त्वचेचा कर्करोग आहे. थोड्या वेळासाठी अनिताला सर्व संपल्यासारखं वाटलं. अक्षयला फोन करुन ती म्हणाली “माझं ऑपरेशन आहे. किती दिवस जगेल माहिती नाही. पण जर जगले तर एक दिवस येऊन तुला नक्की भेटेन.”

ऑपरेशन व्यवस्थित झालं. आता अनिताला अक्षयला भेटायची ओढ लागली. पण देशभरात लॉकडाउन असल्याने ती मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येऊ शकत नव्हती. 1 जून ला अनलॉक फेज वन जाहिर करण्यात आले आणि जास्त वेळ न घालवता अनिता मध्य प्रदेशहून महाराष्ट्रात यायला निघाली.

वर्ध्याला येऊन तिने अक्षयला फोन केला व “मी वर्ध्याल आलेय मला न्यायला ये…” असं सांगीतलं. अक्षय तिला घरी घेऊन गेला. दोघांनी लग्न केलं. हे सगळं झालं याची जराही वार्ता तिच्या घरच्यांना नव्हती. अक्षयनं पोलीसांच्या मदतीने संपुर्ण घटना अनिताच्या घरच्यांना सांगितली. अनिताचे आई वडील येऊन भेटले. ते सध्या नाराज असले तरी एकदिवस दोघांनाही स्विकारतील या आशेने नवीन संसाराचं शुभमंगल सुरू झालंय.

(टिप – घटना खरी असली तरी सर्व सुरक्षेच्या कारणास्तव व्यक्तींचे नावे काल्पनीक आहेत.)

Similar News