राज्यात कोविड सेंटरमधील महिला अत्याचारांच्या घटनांमधे दिवसेंदिवस वाढ होतेय. जर हे प्रकार असेच सुरु राहिले तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा ईशारा भाजपच्या महिला आघाडीने केला आहे. या संदर्भात जालना शहरातील महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात “महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. कोविड सेंटर व हॉस्पीटलमधे महिलावर अत्याचार व विनयभंगाच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. जर महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत गेले तर महिला आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येइल.” असा ईशारा देण्यात आला आहे.