सहावेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या भारताच्या मेरी कोमने रशियात सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात थायलंडच्या जुतुमास जितपाँगवर ५-० असा दणदणीत विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
५१ किलो वजनी गटातील आपले पहिले पदक मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या मेरीने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा बचाव भेदला. दुसऱ्या फेरीपासूनच मेरीने आपला आक्रमक बाणा दाखवून दिला.
मेरी कोमची पुढील लढत १० ऑक्टोबरला रंगणार आहे. कोलंबियाच्या लोरेना व्हिक्टोरिया व्हॅलेन्शिया विरुद्ध मेरी आता जागतिक स्पर्धेतील पदक जिंकण्यासाठी खेळणार आहे.