रायफल शूटींग या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर मी आज खेळत आहे.इथवर पोहचण्यासाठी जी धडपड माझी झाली.हे पाहिल्या नंतर १७० वर्षापूर्वी मुलींच्या शिक्षणासाठी सावित्री बाईनी जे कष्ट घेतले असतील त्याची जाणीव आज मला होत आहे.
मुलीची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली,त्या वेळच्या समाजव्यवस्थेने केलेल्या टीकेला घाबरून न जाता, त्या पाय रोवून घट्ट उभ्या राहिल्या. म्हणूनच आज माझ्या सारखी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी छत्रपती पुरस्कारा सह आंतरराष्ट्रीय पातळीवर रायफल शूटिंग या खेळात पाय रोवून उभी राहिली आहे.
३ जानेवारी हा सावित्री बाईचा जन्मदिवस.तो मी साजरा करणार.त्यांची आठवण जागविणार.दारात रांगोळी काढणार,उंबरठ्यावर विवेकाची पणती लावणार आणि त्यांच्या परी कृतज्ञता व्यक्त करणार
-रुचिरा लावंड
छत्रपती पुरस्कार विजेती आणि रायफल शूटींग या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू