हा दिवस मी सणा सारखा साजरा करणार-चिन्मयी सुमीत अभिनेत्री

Update: 2020-01-01 15:04 GMT

मला अभिमान आहे,मी भारतीय असण्याचा,मला अभिमान आहे मी भारतीय स्त्री असण्याचा आणि मला अभिमान आहे की,ज्योतिबा सावित्रीच्या महाराष्ट्रात मी जन्म घेतला. आज माझ्या समाजा मध्ये मी मनुष्य म्हणून ताठ मानेने जगू शकते, माझी स्वतःची ओळख बनवू शकते कारण मी सुशिक्षित आहे.आणि मी जे शिक्षण घेऊ शकले ते केवळ सावित्री बाई फुले यांच्या मुळे,त्यांच्यामुळे माझी नाळ सतत सावित्री बाईंशी जोडली आहे याची जाणीव असते.

3 जानेवारी हा सावित्री बाईचा जन्म दिवस हा दिवस मी सणा सारखा साजरा करणार आहे.मी माझ्या उंबऱ्यावर त्यांच्या नावे एक पणती लावणार आहे.दारात आकाश कंदील लावणार आहे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार आहे.

-चिन्मयी सुमीत अभिनेत्री

Similar News