माझ्या अडीअडचणीच्या कालखंडातसुद्धा माझी पत्नी स्मिता सावलीसारखी माझ्याबरोबर राहिली. कामात अत्यंत व्यवस्थित असलेली स्मिता धीराचीही आहे. आपण स्वतः खूप मोठं व्हावं, असं तिला वाटलंच नाही. माझ्या मोठेपणातच तिनं तिचा मोठेपणा मानला. आमच्या दोघांचे स्वभाव तसे परस्परविरोधीच; परंतु आम्ही एकमेकांना नेहमी समजून घेतलं. स्मितानं माझ्याबरोबर सर्व आयुष्य गोड मानून घेतलं. आमच्या लग्नाला ३१ वर्ष झाली, ३१ वर्षानंतर मागे वळून पाहता मी अतिशय नशीबवान आहे असेच म्हणावे लागेल.
माझ्यासारखा ध्येयवेडा तरुण हा पत्नीला फारच कमी वेळ देऊ शकतो. मी लग्नाच्या पूर्वीच बायको म्हणालो होतो, ‘हे बघ, मी आहे महत्त्वाकांक्षी, इतरांच्या संसारासारखा संसार आपल्याला करता येण शक्य नाही. रोज संध्याकाळी वेळेवर घरी येणं, आठवड्यातून एक चित्रपट पाहणं, एकदा हॉटेलमध्ये जाणं, हे सारं नेहमीच आपल्याला जमेल असं नाही’ तिनं या गोष्टी मान्य केल्या होत्या. कदाचित ती मनात म्हणाली असेल, ‘एकदा लग्न झाल्यावर बघू’परंतु, लग्न झालं आणि माझी धावपळ आणखीनच सुरू झाली. आजही मला आठवतं की, आमचा वडलोपार्जीत केटरिंग व्यवसाय, नुकताच स्थिरसावर होणारा, मी माझ्या व्यवसायात इतका मग्न की, अंबर मध्ये लग्नाचे कंत्राट असल्यावर मी इतका दमुन जायचो की आणि पाच मिनिटांत जेवून झोपी जायचो.
गेल्या ३१ वर्षांत स्वस्थता अशी मिळालीच नाही. परंतु, स्मिताच्या पायगुणानं आयुष्यात माझी प्रगतीच प्रगती झाली. माझ्या अडचणीच्या, कष्टाच्या काळखंडातसुद्धा ती सावलीसारखी माझ्याबरोबर राहिली. कधीच, कसलीच तिची तक्रार नाही. मुलांची काळजी, अभ्यास, आजार या बाबतीत मी कधीच लक्ष दिले नाही. आमच्या कामांची काटेकोरपणे विभागणी. मी पैसा आणायचा, तिला संसार चालवायला द्यायचा आणि मला जेव्हा-जेव्हा पैसे लागतील, तेव्हा-तेव्हा त्यातून हिनं मला पैसे द्यायचे. एक गृहिणी म्हणून ती अतिशय समाधानी राहिली. माझी आई काही दिवस माझ्याकडे व काही दिवस माझ्या बंधूच्याकडे असायची, आमच्या कडे माझी आई असताना कधीही तिने सासू या नात्याने तिच्याशी वागणूक केली नाही, माझ्या आईच्यात व तिच्याच खूप अंतर असल्यामुळे ती आईला तिची आजीच समजून वागायची.
मी अतिशय सर्किट, आमच्या व आमच्या बंधूच्या घराला बॉंडीग करून ठेवणारी म्हणजे
स्मिता...
२००३ मध्ये हॉस्टेल चालु करताना तू ते बघशील का ? हे विचारल्यावर 'होय' या एका शब्दात स्मिताने हॉस्टेलची जबाबदारी घेतली व आज होस्टेल ची जबाबदारी एकटीने अतिशय उत्तमरीतेने सांभळत आहे. २००६ ला रत्नागिरीला कार्यालय बांधण्यास मला स्मिताने मला आग्रह धरला, नुकतेच पुण्यातील अंबरचे केटरींग सोडले होते, पुण्यात कार्यालय बांधणे अर्थीक दृष्ट्या परवडणारे नव्हते, मग सर्वे केला, व रत्नागिरीला कार्यालय व हॉटेल सुरु केले, माझ्या सर्व यशात स्मिताचा सिंहाचा वाटा आहे.
साल २०१३ उमाच्या लग्नाचा प्रसंग, मुलाला बघायला जायला आम्ही नेदरलॅन्डला गेलो, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम, स्मिताचे मत होते मुलगा कितीही चांगला असला तरी त्याचे घर बघायाला नको का ?
१७ डिसेंबर २०१३
आमच्या कुटुंबाचा आनंदाचा दिवस सिद्धेश व उमाचे लग्न, लग्नात स्मिताचा उत्साह ओसंडून वहात होता. मी तिला आधीच सांगितले होते बिदाईच्या वेळेस मी थांबणार नाही. ही धीराने म्हणाली, असे भावनीक होऊ नका, आपण कोणीही उमा सासरी जाताना अजिबात रडायचे नाही. यात स्मिताचा धीरोदत्तपणाचा अनुभव मला आला. आज सिद्धेश व उमाच्या लग्नाला ६ वर्ष होऊन गेली, सिद्धेश व उमा नेदरलॅन्डला सुखाने संसार करत आहेत व रीवा सारखे फुलपाखरु त्यांच्या जीवनात बागडत आहे.
२०१७ ते २०१९ ही माझ्या आजारपणाची वाईट २ वर्षे होती. या दोन वर्षा स्मिता माझ्या मागे सावली सारखी होती.
प्रिये तू मनमोहिनी अर्धांगिनी,
श्वास माझा, तू माझी स्वामिनी...
मज साथ तुझी जन्मोजन्मी
तू सावित्री अन सत्यवान तुझाच मी
मी राजा तुझा अन तू माझी राणी
तुजविना मी अधूरा तू माझी अर्धांगिनी...
स्वप्न माझे पाहिले मी तुझ्या नयनी
साथ तुझी अखंडित माझ्या जीवनी
स्वप्न होईल पूर्ण सुखाला हो मग कसली कमी
आस माझ्या मनीची प्रिये तू माझी अर्धांगिनी...
स्वर्गसुख आज मागतो अश्रू कदा न तुज नयनी
तुज मिळो सारं काही, दुःखासाठी सदा असो मी
तूच सखी तूच प्रिया तू राधा माझी अन कृष्ण तुझा मी
पूर्णत्व प्राप्त मज तुजमुळे प्रिये तू माझी अर्धांगिनी...
प्रिये तू मनमोहिनी अर्धांगिनी,
श्वास माझा, तू माझी स्वामिनी...
(कवी माहित नाही.)
आज तिचा ५० वा वाढदिवस.
वाढदिवसानिमित्त तिला खूप खूप शुभेच्छा.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३