नाशिकच्या पुनम सोनुने हिने 17 व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अॅथलेटीक अजिंक्यपद स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. तामिळनाडू येथील तिरुवन्नामलाई येथे २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत देशभरातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी हरियाणाच्या किरण ने ९ मिनीट ५५ सेकंदाची वेळ नोंदवत रजत पदक पटकावले. तर गुजरातच्या दृष्टीबेन प्रविणभाई हिने हे अंतर १० मिनीटे २ सेकंदात पूर्ण करुन तिसऱ्या क्रमांक पटकवून कांस्यपदक मिळवले. या दोघींना मागे टाकून पुनम ने ३ हजार मीटरचे अंतर अवघ्या 9 मिनीट 52 सेकंदात पूर्ण केले.