भारताच्या मंजू राणीनं जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवून ऐतिहासिक कामगीरी केली आहे. तसेच, १८ वर्षांनंतर पदार्पण करून, या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
४८ किलो वजनी गटात मंजू राणीला अंतिम फेरीत रशियाच्या एकातेरीना पाल्टेसेवाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मंजू राणीचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
या स्पर्धेमध्ये यापूर्वी भारताकडून मेरी कोम, जमुना बोरो आणि लवलीना यांनी कांस्य पदकाची कमाई केली होती. तर, मंजू राणीने रौप्य पदकाची मानकरी ठरली आहे.