आपली मुलं ऑनलाईन सर्फिंगवर करत असतील तर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या सायबर विभागातर्फे करण्यात आले आहे.
७ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांना आपले पाल्य ऑनलाईन सर्फिंग करताना त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे. जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची माहिती करून घ्या, तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लिक करत आहेत किंवा काय वेबसाईट ब्राऊज करत आहेत यावर लक्ष ठेवा.
पोर्न वेबसाईट टाळा
पालकांनी सुद्धा पोर्नोग्राफिक वेबसाईट शोधून त्यावर क्लिक करणे टाळा कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्याला कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही ना याची खात्री करा. तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळा, तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा. जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले की, आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन घोटाळा (fraud) किंवा ऑनलाईन रॅकेटमध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रारीची नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण द्यावी. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.