राज्यात वाढत्या महिला अत्याचावर आपण नेहमीच बोलत असतो. या अत्याचारांमध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाणही तेवढंच लक्षणीय आहे. लहान असल्याने या पीडित मुलींना अनेकदा व्यक्त होता येत नाही. त्यामुळे आरोपी उजळमाथ्याने फिरत असतात.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यातून 'पोलीस दिदी' या मोहिमेची प्रायोगीक तत्वावर सुरुवात करण्यात आली. कालांतराने अपेक्षेप्रमाणे याचा परिणाम दिसू लागला. पीडित महिला बोलायला लागल्या, अपल्यावर झालेला अत्याचार त्या पोलीसांसमोर मांडू लागल्या.
चेंबूरमधून सुरु झालेली ही मोहिम आज संपुर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे. पाहा या मोहिमेचा सुरुवातीपासून भाग असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांची कहाणी..