‘जयाजी एक दिवस अभिषेक लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर...’ कंगना पुन्हा बरळली
राज्य सभेत सभागृहात शून्य प्रहरामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं. यावर आता कंगना राणावतने प्रतिक्रीया दिली आहे.
“जयाजी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेतासोबत किशोरवयात मारहाण, ड्रग्ज देणे आणि विनयभंग झाला असता तर तुम्हीही असेच म्हणाला असतात का? अभिषेकने सतत गुंडगिरी आणि छळवणूक झाल्याबद्दल तक्रार केली असती, आणि एक दिवस तो लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर आपण असेच बोलला असता काय?” असा सवाल अभिनेत्री कंगना राणावत हिने विचारला आहे.
Jaya ji would you say the same thing if in my place it was your daughter Shweta beaten, drugged and molested as a teenage, would you say the same thing if Abhieshek complained about bullying and harassment constantly and found hanging one day? Show compassion for us also 🙏 https://t.co/gazngMu2bA
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 15, 2020