पहिल्यांदाच हजारो इराणी महिलांनी (Iran women) तेहराम येथील आझादी स्टेडीअममध्ये (Azadi stadium) उपस्थित राहून फूटबॉल सामन्याचा आनंद घेतला. जवळ जवळ ४० वर्षांपासून इराणमध्ये महिलांना खेळांच्या स्टेडीअममध्ये येण्यास बंदी घातली होती.
परंतू ‘फिफा’ (FIFA) द्वारा इराण फूटबॉल असोशिअन वरील दबावामुळे स्टेडीअमध्ये स्त्रीयांना प्रवेश देण्यास सुरवात झाली आहे.
गेल्या महिन्यात ‘फिफा’ ने इराणवर दबाव टाकत महिला प्रेक्षकांना प्रवेश द्या अथवा तिकीटांच्या निश्चित केलेल्या संख्येनुसार स्टेडीअममध्ये लोक न आल्यास इराणला फुटबॉल स्पर्धेतून निलंबीत करण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली होती.
त्यानंतर गुरूवारी इराण आणि कंबोडीयामध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात इराणी महिलांना पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी प्रवेश देण्यात आला. या सामन्यात इराणने कंबोडीयावर १४-० असा दणदणीत विजय मिळवला मात्र इराणी महिलांचा आनंदच या सामन्याचे विशेष आकर्षण ठरले.