कोरोना पासून जगाला वाचवण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली महिला

Update: 2020-04-12 17:53 GMT

जेनिफर....तुझ्या या धाडसाला जगाचा सलाम !!

अमेरिकेची जेनिफर हेलर जगातील पहिली महिला आहे, जिच्यावर कोरोना व्हायरस च्या निदाना साठी टेस्ट करण्यात येत आहे. कोणत्याही वॅक्सीन टेस्ट साठी तंदुरस्त व्यक्ती हवा असतो. रोगाचा त्या व्यक्तीवर प्रयोग करण्यात येतो. असं करीत असतांना त्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो. कोरोना सारख्या महामारीतून जगाची सुटका व्हावी म्हणून आपला जीव धोक्यात टाकून जेनिफर पुढे आली...

जेनिफर दोन मुलांची आई आहे. मात्र जगाला या महामारीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हे धाडसी पाऊल उचललं. जगात बरंच काही वाईट होतं आहे. तर काही चांगलं ही. चांगली माणसं आणि त्याचे चांगले प्रयत्न या मुळेच जग अजूनही सुंदर आहे. आशा आहे की, जेनिफर वरचे प्रयोग यशस्वी होतील. जगाच्या कल्याणासाठी सामोरी आलेल्या जेनिफरला लाख लाख सलाम !!

Similar News