‘ज्या ताटात खातात, त्याच ताटात…’ राज्य सभेत जया बच्चन भडकल्या

Update: 2020-09-15 09:35 GMT

बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं. सभागृहात शून्य प्रहराला त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडला.

त्या म्हणाल्या की, “सध्या बॉलिवूडची बदनामी करण्याचा कट रचला जात आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रा दररोज ५ लाख लोकांना सरळ रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आणि गोष्टींवरून ध्यान हटवण्यासाठी आमचा वापर केला जात आहे. सोशल मीडियावरही आमच्यावर निशाणा साधला जात आहे. आम्हाला सरकारकडूनही समर्थन मिळत नाही आहे. ज्या लोकांनी सिने इंडस्ट्रीच्या मदतीने नाव कमावले ते याला गटार म्हणत आहे. मी याचे समर्थन करत नाही.”

“काही लोकांच्या आपापसातील लढाईमुळे इंडस्ट्रीचे नुकसान होत आहे हे सरकारला पाहावे लागेल. ही इंडस्ट्री लाखो लोकांना रोजगार देते. जर काही लोकांमध्ये आपापसात मतभेद असतील तर त्याचा परिणाम संपूर्ण इंडस्ट्रीवर होता कामा नये. सरकारला पुढे होत या प्रकरणामध्ये लक्ष घातले पाहिजे.”

दरम्यान, या आधी कंगना राणावतने ही बॉलिवूडला ‘गटार’ म्हटलं होतं.

Full View

Similar News