#HAPPY BIRTHDAY : विराट कोहली

Update: 2019-11-05 11:05 GMT

महिलांना क्रिकेटबद्दल जास्त माहिती नसली तरी, क्रिकेटपट्टू विराट कोहली बद्दल बरीच माहिती असते. भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३१वा वाढदिवस आहे.

विराट कोहलीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. टी-ट्वेंटी, एक दिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. तसेच सध्या तो जगातील यशस्वी कॅप्टन पैकी एक असून, सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या प्रगल्भ कारकीर्दीमुळे दिग्गज खेळाडूंच्या यादीत त्याच नाव येतं. विराट कोहली सध्या त्याची पत्नी म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासह भुटानमध्ये सुट्टीवर आहे. आणि तिथेच त्याने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पसंती दिली आहे.

आपल्या वाढदिवसानिमीत्त विराटने स्वत:ला पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पत्रात १५ वर्षीय विराटला उद्देशून म्हटल आहे की, प्रिय चिकू सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मला माहित आहे की, तुला तुझ्या भविष्याबद्दल खूप सारे प्रश्न पडले असणार पण त्या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहीत. पण हे सर्वच खूप रोमांचक असेल.

Similar News