कोरोनाचे संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडल्याची टीका भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी बुधवारी राज्यसभेत केली. सहस्त्रबुद्धे यांच भाषण ऐकून घरी सभागृहातून निघालेल्या जया बच्चन परत आल्या व सहस्त्रबुद्धे यांच्यावर भडकल्या.
बच्चन म्हणाल्या की, “मी घरीच निघाले होते. पण यांचं भाषण ऐकून परत आले. माझ्या परिवारातील लोकही कोरोना पीडित होते. ज्या प्रकारे फक्त त्यांचंच नाही तर त्या रुग्णालयातील सर्वच रुग्णांची ज्या प्रकारे काळजी घेतली जात होती. ते कौतुक करण्यासारखं आहे.”
“एवढच नाही तर मुंबईतील रस्त्यावर ज्या प्रकारे सॅनिटायझर फवारण्याचं काम सुरु होतं त्याची तुलना कशाचीच करु शकत नाही. तेव्हा कृपया या गोष्टीचं राजकारण करु नका.” असं बच्चन यांनी म्हटलं आहे. सभागृहात बोलताना जया बच्चन भावुक झाल्या. व जाग्यावर बसल्या.