माध्यमांनी कंगना राणावतला किंमत देण्याची गरज नाही : बच्चू कडू

Update: 2020-09-17 07:15 GMT

गेले अनेक दिवस शिवसेना आणि कंगना राणावत यांच्या मधला वाद चांगलाच पेटला आहे. कंगना राणावत रोज ट्टिटच्या माध्यामतून शिवसेनेवर टीका करत आहे. या वादामुळे कंगना राणावतवर अनेकांनी टिका केल्या तर काही जणांनी तीचे समर्थन देखील केले. मात्र शिवसेनेला पाठिंबा देणारे बच्चू कडू यांनी सुद्धा कंगना राणावतवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिच्यामुळे राज्यातील सरकार पडण्याचा प्रश्न येत नाही. कारण शिवसेनेचा वाघ तिथं बसला आहे. माध्यमांनीही अशा अभिनेत्रीला किंमत देण्याची गरज नाही, जिची कवडीची ही किंमत नाही. अशा शब्दात बच्चू कडू यांनी कंगना वर टीका केली आहे.

कंगना राणावतला ग्रामपंचायत निवडणुकीत जरी उभं केलं तरी ती निवडून येणार नाही. इतकं नव्हे तर तिचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी कंगनाची खिल्ली उडवली.

 

Similar News