145 व्या महिलेची जटेतुन मुक्तता...

Update: 2019-12-18 05:18 GMT

अंनिस पुणे जिल्ह्या तर्फे 145 व्या महिलेची जटेतुन मुक्तता करण्यात आली. संध्या (वय 29वर्षे)राहणार खडकी तिला छोट्या 4 मुली परिस्थिती बेताचीच स्वयंपाकाचे काम करून स्वतःचा,कुंटुबाचा उदरनिर्वाह ती करते. जेमतेम घर चालवण्याइतकेच पैसे मिळत होते.त्यात दीड वर्षापूर्वी तिच्या केसात जट तयार झाली होती.याबाबत तिने जटेबाबत विचारले असता.ही जट देवाची आहे आणि तुला आता गुरू करावा लागेल.त्या विधी साठी 60/70 हजारापर्यत खर्च येईल असे सांगण्यात आले.

ही जट कापायची नाही.डोक्यातील जट कापु नको. तुला आम्ही आमच्या परिवारात सामील करून घेवु.तु मंगळवार,शुक्रवार चार घरी जोगवा माग.यावर तुझा घर परिवारही चालेल असेही सांगण्यात आले.परंतु एवढे पैसे खर्च करण्याची ऐपतही नव्हती.

मनात मात्र भीतीने जागा घेतली होती.संध्याची एक मुलगी तळेगांव संस्थेत (प्रेरणा रेम्बो संस्था) आहे.त्या संस्थेच्या कार्यकर्त्यानी संध्याच्या डोक्यातील जट पाहीली व त्यांनी माझ्याशी संपर्क केला.मी संध्याशी फोनवर बोलले.संध्याला जटेचा खुप त्रास होत होता.त्यामुळे तिने लगेच होकार दिला.शनिवारीच जट कापायचे ठरले मी खडकीला येते म्हणुन सांगितले पण मला एका केस संदर्भात समुपदेशन करायचे होते.तिथेच मला वेळ लागला.

सोमवारी आपण जट काढु या असे सांगितले.ठरल्याप्रमाणे साधना मिडीया सेंटरला 4:00 वाजता संध्याच्या डोक्यातील जट कापुन तिला जटेच्या अंधश्रध्देतुन मुक्त करण्यात आले.यावेळी संध्याची आई,बहिण तसेच चिवटी फिल्मचे कलाकार,दिग्दर्शक,वार्तापत्र विभागाचे अनिल चव्हाण सर( सांगली)तसेच प्रेरणा संस्थेची कार्यकर्ती रजिया खान, कोल्हापुर येथील महा.अंनिसचे राज्यप्रधान सचिव!मिलिंद देशमुख,अंनिस पुणे शहर युवा कार्यकर्ता, सोरभ बागडे या सर्वाच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कार्याध्यक्ष,नंदिनी जाधव यांनी जट निर्मुलन केले.

 

-नंदिनी जाधव

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती

पुणे जिल्हा,कार्याध्यक्ष

9422305929

Similar News