शेती आणि शेतीच्या कामांमध्ये 80 टक्के वाटा हा महिला शेतकऱ्यांचा आहे. महिला मोठ्या प्रमाणावर शेतात कष्ट जरी करत असल्या तरीही ती शेतजमीन पुरुष मंडळींच्या नावावरच असते. ही जमीन पुरुषांच्या नावावर असल्यामुळे महिलांना ट्रॅक्टर घेणे, नवीन काही सरकारी योजनांचा लाभ घेणे, शेतात विहीर मंजूर करणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. महिला शेतकऱ्यांना शेत जमीन त्यांच्या नावावर नसल्याने काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं जाणून घ्या.