राष्ट्रपति पदकाचा सन्मान पटकविणाऱ्य रश्मी करंदीकर कोण आहेत ?
महाराष्ट्र पोलीस दलाची शान असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी रश्मी करंदीकर (DrRashmi Karandikar) एक मुख्य नाव आहे. आणि मुंबई सायबर शाखेच्या पोलीस उपायुक्त पदी असणाऱ्या धडाडीच्या आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांना राष्ट्रपती पदकाने गौरवले जाणार आहे.;
महाराष्ट्र पोलीस दलाची शान असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी रश्मी करंदीकर (DrRashmi Karandikar) एक मुख्य नाव आहे. आणि मुंबई सायबर शाखेच्या पोलीस उपायुक्त पदी असणाऱ्या धडाडीच्या आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांना राष्ट्रपती पदकाने गौरवले जाणार आहे. अस म्हंटल जात की ह्युमन ट्रॅफिकिंगमधल्या गुन्हेगारांना धडकी भरवण्यासाठी रश्मी करंदीकर हे नावच पुरेस आहे. शोषणाच्या दलदलीत रुतलेल्या अनेक महिलांना त्यांनी जगण्याचा आधार दिला असून, त्यांची सुखरूप सुटका देखील करण्यात रश्मी करंदीकर यांना यश मिळाल आहे. इतकेच नव्हे तर जास्तीत जास्त आरोपी कसे गजाआड जातील यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.
कोण आहेत रश्मी करंदीकर?
रश्मी करंदीकर या महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकारी आहेत. करंदीकर यांनी मुंबई विद्यापीठातून सांख्यिकी विषयात B.Sc केले आहे. वर्ष 2000 मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
रश्मी करंदीकर 2004 मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना रश्मी करंदीकर यांनी समाजशास्त्रात पीएचडीही केली. रश्मी करंदीकर यांची महाराष्ट्र पोलीस दलात विविध पदांवर कर्तव्य बजावलं आहे. त्या नेहमीच त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे चर्चेत राहिल्या आहेत. मुंबईत सायबर सेलमध्ये काम करत असताना सायबर क्राईमच्या अनेक केसेस त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने मोठ्या हुशारीने आणि कमी वेळेत सोडवल्या आहेत. सायबर क्राईमच्या केसेस सोडवण्याव्यतिरिक्त त्यांनी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी देखील अनेक उपक्रम हाती घेतले. नागरिकांना सायबर गुन्हेगारांपासून कसं दूर ठेवता येईल यासाठी देखील त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्रातून रश्मी करंदीकर, संजय जाधव, राजेश्वरी कोरी, रविंद्र चारदे, अरुण परिहार, अमित तिमांडे आणि योगेश जाधव या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. रश्मी करंदीकर या सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत आहेत. पोलीस खात्यात भरती होते, तेव्हा ती व्यक्ती असते अक्षरशः मातीच्या गोळ्यासारखी! त्या व्यक्तीच्या संपर्कात येणारा पहिला वरिष्ठ अधिकारी तिला ठाकून ठोकून ‘घडवण्याची’ प्रक्रिया सुरू करतो, तेव्हाच त्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार प्राप्त होतो. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्चना त्यागी मॅडमसारखे कर्तव्यतत्पर असतील तर? प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्यांच्या हाताखाली मी रुजू झाले आणि माझा उमेदवारीचा काळ कसा असेल ते लगेच माझ्या लक्षात आलं असं रश्मी करंदीकर म्हणाल्या होत्या.
मुस्लिम महिलांची विक्री केली जात होती त्याचा त्यांनी छडा लावला
आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातले ह्युमन एस्कॉर्टमधले छुपे हस्तक त्यांची धास्ती खाऊन असतात. आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर आपली काही धडगत नाही हे त्यांना ठाऊक असतं!
बुलीबाई ऍप नावाच्या ऍपवरून मुस्लिम महिलांची विक्री केली जात होती त्याचा त्यांनी छडा लावला आणि ती पूर्ण यंत्रणा उध्वस्त केली याची दखल आंतरराष्ट्रीय मीडियानेही घेतली होती. सायबर गुन्ह्यांचे सातत्याने बदलत राहणारे स्वरूप आणि त्यानुरूप तपास यंत्रणेस सक्षम करत असंख्य तपासमोहिमा त्यांनी फत्ते केल्यात. महिलांना ऍब्युज करणाऱ्या, महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना देहविक्री करसण्यास भाग पाडणाऱ्या अनेक रॅकेट्सचा त्यांनी धुव्वा उडवला आहे. त्यांच्याकडे माहिती खबर येताच त्या त्वेषाने नि जोमाने कारवाई करतात. पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना हे पदक दिलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या ७८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर यांचं नाव पहिलं आहे. तर देशभरातल्या एकूण ७५३ अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झालं आहे.
रश्मी करंदीकर या उत्तम पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रपती पदकासाठी त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या ७८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक दिलं जाणार आहे. त्यात रश्मी करंदीकर यांची निवड झाली आहे. रश्मी करंदीकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे पदक देऊन गौरवण्यात येणार आहे.