गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसने देशात थैमान घातलं आहे. एका वर एक अशा कोरोनाच्या लाटा येत असताना नागरिकांमध्ये भितीचं वातावरण तर आहे. मात्र, शारीरिक समस्यांसोबतचं मानसिकतेवर होणारा आघात आणि त्यातून होणारं खच्चीकरण नागरिकांना कमकुवत करत आहे. त्यातचं विषय जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचा येतो तेव्हा जरा परिस्थिती गंभीरच आहे असं वाटू लागतं.
कोरोना काळात अनेक वृद्धांना आपला जीव गमवावा लागला. अनेक कुटुंबांचा आधारवड असलेले ज्येष्ठ लोक त्यांना सोडून गेले. ही सगळी परिस्थिती पाहता अनेक सीनिअर सिटिझनमध्ये भीती पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर कोविडचा सर्वाधिक धोका वृद्धांना आहे का? कोविड काळात वृद्धांना कोणती भीती सतावतेय? काय आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक समस्या? ज्येष्ठ नागरिकांनी आपला मानसिक ताण कसा दूर करावा? कसं करावं दिवसाचं नियोजन? आणि आपण घरातील आधारवड असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी कशी घ्यावी?
कोविड काळात शारीरिक समस्यांसोबत मानसिक समस्याही दृढ झाल्याचं चित्र समाजात पाहायला मिळत आहे. अनेक जण नैराश्य, डिप्रेशन, उदासिनता, एकलकोंडेपणाच्या गर्तेत अडकले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता नागरिकांच्या (लहानांपासून-वृद्धांपर्यंत) मानिसक आरोग्याची जनजागृती करण्याचा ध्यास मॅक्स महाराष्ट्र, मॅक्सवुमन आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने 'जनजागृती मानसिक आरोग्याची' या विशेष कार्यक्रमातून करणार आहोत.
यासंदर्भात मानसशास्त्रज्ञ माधुरी तांबे यांची मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पॉडंट किरण सोनावणे यांनी घेतलेली मुलाखत नक्की पाहा...