हाथरस पीडितेच्या न्यायातील अडथळे कोणते?

हाथरस पीडितेच्या न्यायातील अडथळे कोणते? माध्यमं नक्की कोणतं narrative सेट करतात? CBI आणि SIT च्या तपासावर किती विश्वास ठेवावा? वाचा विनय काटे यांचा लेख

Update: 2020-10-08 21:45 GMT

'आज तक' ची श्वेता सिंह गावातल्या असंख्य उच्चवर्णीय लोकांकडून गेले. 30-40 मिनिटं खालील वाक्य वारंवार बोलवून घेतंय.

१) आम्ही पीडित मुलीसोबत आहोत. आमच्या गावात कसलीही जातीय तेढ नाही. (मुलीच्या दारात बसून तिच्या घरच्यांना ठाकूर दम देताना सगळ्यांनी पाहिले असताना)

२) इथे दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय, इथली कायदा सुव्यवस्था खूप चांगली आहे. (उत्तर प्रदेशचे गुन्हेगारीचे आणि दंगलीचे आकडे वेगळं सांगत असताना)

३) ही कारवाई फक्त वोटबँकसाठी राजकीय हेतूने प्रेरीत आहे. (वाल्मिकी समाजापेक्षा ठाकूर आणि ब्राम्हण उच्चवर्णीय वोटबँक मोठी असताना)

४) राहुल गांधी आणि भीम आर्मी इथे फक्त राजकारणासाठी आले आहेत. (अजय बिष्ट तर सरकारचे कर्तव्य म्हणून खुद्द मोदींचा फोन येऊनही गेले नसताना)

५) CBI, SIT द्वारेच तपास होऊन न्याय व्हावा. (कारण ते उत्तर प्रदेश सरकारने सुचवले आहे.)

६) मुलीवर रेप झालाच नाही. (FSL च्या रिपोर्टमध्ये योनीच्या आतमध्ये दोन जखमा असल्याची नोंद असल्याची बातमी आली असताना)

ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने narrative बनवलं आहे. तेच शब्द सगळे लोक वारंवार बोलून बोलून प्रेक्षकांच्या मनात ते सत्य असल्यासारखं वाढलं जात आहे. यातले कित्येक लोक त्या गावातील नसतीलही, पण पढवून आणलेले असतील.

श्वेता सिंह किती सच्ची पत्रकार आहे आणि आजतक किती श्रेष्ठ चॅनेल आहे? हे सगळेच जाणतो आपण!

पीडितेला न्याय मिळत नसतो, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!!!

(विनय काटे यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Tags:    

Similar News