शिक्षणाची वाट थांबली आणि पुन्हा तिच्यासोबत समाजाच्या अधोगतीची वाटचाल सुरु झाली. कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक देश लॉकडाऊन झाले. जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. शाळा बंद झाल्यानं ऑनलाईन शिक्षण सुरु झालं. मात्र, ऑनलाईन शिक्षण म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला लागलेली कात्री... त्यात हातचा गेलेला रोजगार… जगण्यासाठीची लोकांची धडपड या सगळ्या संकटमय परिस्थितीत मुलींच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं...
मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यामुळे थेट तिचं शिक्षण बंद करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शाळाबाह्य झालेल्या मुलींचं शिक्षण सुरु करण्यासाठी नेमकं काय-काय करता येईल? मुलींसाठी ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाईन शिक्षण बेस्ट आहे का? आर्थिक परिस्थिती नसताना मुलींना शिक्षण कसं द्यावं ? यासंदर्भात महिला अभ्यासक रेणुक कड यांनी केलेले मार्गदर्शक विश्लेषण नक्की पाहा.