Social Empowerment Day: सत्याग्रहात अन्य जातीचे लोक होते का? तिस्ता सेटलवाड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ज्यांच्या पुर्वजांनी काम केलं त्या डॉ. तिस्ता सेटलवाड यांनी आज महाडच्या चवदार तळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त काही प्रश्न उपस्थित करत भारताच्या सामाजिक एकतेच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. वाचा काय म्हटलंय तिस्ता सेटलवाड यांनी...;
चवदार तळे सत्याग्रहाचा आज वर्धापन दिन. आजच्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 ला महाडच्या चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला. तसं पाहिलं तर पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे. मात्र, तो हक्क दलितांना वर्षोनुवर्ष नाकारण्यात आला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळे येथे केलेला सत्याग्रह ही एक सामाजिक क्रांती होती.
त्यांच्या या एका सत्याग्रहामुळे देशभरातील सर्व दलित बांधवाना पाण्याचा हक्क मिळाला. देशातील लोकांना पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागतो. एका विशिष्ट समाजाला सामाजिक पाणवठ्यापासून वर्षोनोवर्ष वंचित ठेवले. त्यामुळे बाबासाहेबांच्या या कृतीची दखल जागतीक पातळीवर घेण्यात आली.
आंबेडकर यांनी केलेला सत्याग्रह फक्त दलितांनी केला होता का? या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड सांगतात...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहात अन्यजातीचे देखील लोक होते. चिटणीस, सहस्त्रबुद्धे देखील यामध्ये सहभागी झाले.
मात्र, आज 94 वर्षानंतर डॉ. बाबासाहेबांनी लक्ष ठेवलेल्या मुद्द्यावर आपण किती पुढे गेलो आहोत. जातीव्यवस्था, समानता, संविधानाचे अधिकार लोकांना मिळाले का? गेल्या 6 वर्षात आपण कुठं आहोत. द्वेशाचं राजकारण, हाथरस, उन्नाव सारख्या घटना घडल्या. आत्ता 4 दिवसांपुर्वी मंदिरात एक मुलगा पाणी पिला म्हणून त्या मुलाला बेदम मारहाण झाली. भारत कुठं जात आहे. याचा विचार करावा लागणार आहे.
आजच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना काही सवाल आजच्या भारताला केले आहेत. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी का केली? तो हेतू साध्य झाला का? लोकशाहीमध्ये मनी पॉवर, मसल पॉवर काय कामाची आहे? आपण सामाजिक एकता प्रस्थापित करु शकलो का?