"चला तर मग आपण या लहान मुलांमध्ये मिसळू या"...
'बालपण कीती सुखी असतं' यावर समुपदेशक पुष्पा सूर्यवंशी यांनी व्यक्त केलेलं मत नक्की वाचा
मन किती विचित्र गोष्ट आहे. क्षणाक्षणाला मनात तरल भावना निर्माण होतात आणि आपण एका वेगळ्या विश्वास जातो. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला नेहमी वाटायचं आपण लवकरात लवकर मोठं व्हावं.त्यासाठी आपल्याला आपली आई, बाबा, बहीण, भाऊ जे कोणी आपल्यापेक्षा मोठी असतील त्यांच्या बाजूला उभे रहायचं आणि म्हणायचं हे बघ मी तुझ्या पेक्षा मोठी झाली आहे. हे बघ दादा मी तुझ्या पेक्षा मोठी आहे, किती छान वाटायचं ते खोटं खोटं... आणि तेही म्हणायचे हो खरंच! किती मोठी झाली आहेस तू .वाटायचं आपण लवकरात लवकर मोठे झालं पाहिजे .खूप खूप फायदे असतात मोठं झाल्यावर.खूप खूप पैसा असतो आणि आपल्याला मनाला तसं वागता येतं. पण जसं जसं मोठे व्हायला लागतो तसतसं काय लागतं हातात .नाही यार, मोठे होण्यात काहीच अर्थ नाही.
मोठे होण्यात अजिबात आनंद नाही. लहानपण फारच सुखद आणि सुरेख होत. म्हणून मग संत तुकारामाच्या अभंगाच्या ओळी आपल्या मनात, ओठावर येतात "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" ते जीवन,ते बालपण ते सगळं आनंद किती रमणीय होतं ना.? लवकर तयार व्हायचं, शाळेत जायचं ,मुला मुली सोबत दंगा मस्ती करायचं ,कोणी शंका घेणार नाही, कोणी संशय घेणार नाही, कुणाला मारायचं, कुणाच्या पाटीवर बसायचं, कितीतरी आनंद... अगदी हातात हात घट्ट धरून सव्वीस जानेवारी , पंधरा ऑगस्टला मित्र मैत्री सोबत रांगेत जायचं आणि एखादा मित्र किंवा मैत्रीण आपला हात सोडून जात असेल तर हात घट्ट पकडून ठेवायचं. रांग सोडू नको म्हणून सांगायचं ...आणि आज वाटतं ते दिवस पुन्हा कधीच येणार नाही आयुष्यात. ही गोष्ट खरी आहे की पुन्हा ते दिवस कधी येणार नाहीत. आपणास भूतकाळात जाता येणार नाही पण याचा अर्थ ते सुख, ते अनुभव, तो आनंद आज आपण अनुभव घेऊ शकत नाही असं नाही. आपण जर ठरवलं तर नक्कीच त्यांवर आजही आनंद घेऊ शकतो. त्यासाठी हवा लागतं मनाचा मोठेपणा. लहान होण्याची तीव्र इच्छा आणि मुलांना मिसळण्याची मानसिकता तुमच्याकडे असली पाहिजे.तुम्हाला अजूनही लहान होता येत. त्यांच्या सोबत फुगडी खेळता येतं, त्यांच्यासोबत लंगडी खेळता येतं, त्यांच्यासोबत घोडागाडी होता येत . त्यांच्या सोबत कबड्डी खेळता येतं.
यासाठी फक्त आपल्याला लहान व्हावं लागतं. मोठेपणा अगदी विसरून घेऊन लपवाछपवी खेळायचं ,डोळे बंद करून ओळखा पाहू म्हणायचं, किती मस्तच ..मोकळं होत आलं पाहिजे.आणि ठरवलं तर नक्कीच आपण होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? फक्त आपल्याला आजची टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप, फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम... या सगळ्या बाबीपासून दूर जाव लागेल काही काळासाठी. आणि मनसोक्त आनंदी घ्यायचं, पुन्हा एकदा रमणीय पद्धतीने जगायचं, मुलांनाही खूप बरं वाटेल बर का! सोबत तुम्ही खेळायला लागला तर तुमचं प्रत्येक गोष्ट ऐकायला लागतात. मग ती खेळण सुद्धा थांबवतात. मग वेळेवर जेवण करतात, वेळेवर अभ्यास करतात, वेळेवर सगळ्या गोष्टी करतात, फक्त गरज आहे तुम्ही त्यांना समजून घेण्याची, तुम्ही त्यांच्यात मिसळण्याची, तुम्ही तुमचा मोठेपणा, अहंकार, श्रेष्ठत्व, पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवण्याची.. ते करू शकतो आपण. पण त्यासाठी असावा लागतो मनाचा मोठेपणा, आणि मनात निर्माण होणाऱ्या भावनांना वाट करून देण्याची, क्षमता ती सगळ्यांकडे नक्कीच आहे, आता सुट्ट्या लागत आहेत, चला तर मग आपण या लहान मुलांमध्ये मिसळू या,पुन्हा एकदा लहान मुल होऊया, अगदी बालपण आठवूया, आणि पूर्ण रसरस भरून घेऊया... पुन्हा एकदा आयुष्यात आनंद उभा करूया, मग आपल्याला नक्कीच सुखात आणि सुखी राहता येईल नाही का..?