#NoShaveNovember : दाढी वाढवल्याने खरच महिला आकर्षित होतात का?

'महिलांना दाढी ठेवणारे पुरुष जास्त आवडतात' असा अनेकांचा समज झालाय. त्यामुळे बरेच जण 'No Shave November' हा ट्रेंड फॉलो करत आहेत. पण या ट्रेंड मागचा मुळ उद्देश अनेकांना माहिती नाहीय... जाणून घेण्यासाठी वाचा सई मनोज यांचा लेख

Update: 2020-11-03 02:30 GMT

नोव्हेंबर महिना आला की सोशल मिडियावर एक ट्रेंड प्रचंड लोकप्रिय होतो.. तो म्हणजे हॅशटॅग 'नो शेव नोव्हेंबर'.. बरेच जण 'नो शेव' चा अर्थ दाढी मिश्या वाढवणे, डोक्यावरचा केसांचा भार वाढवणे असा घेतात.. म्हणजे अर्थ तर तस्साच आहे. पण खूप खोल अर्थ आहे या ट्रेंडचा तो बऱ्याच जणांना माहितही नसतो..

नो शेव नोव्हेंबर म्हणजे दाढी वाढवून एखाद्या सिने अभिनेत्यासारखा हॅंडसम लूक करणे आणि महिनाभर ट्रेंडच्या नावाखाली मिरवणे, एवढाच काही जणांचा समज झालेला असतो..

खर तर ' नो शेव नोव्हेंबर ' हि एक २००९ साली स्थापना झालेली संस्था आहे. जिचा उद्देश कॅन्सरच्या रूग्णांना आर्थिक सहाय्य देणे, एकंदरित सर्वच प्रकारचा पाठिंबा देणे हा आहे.

२००७ साली मॅथ्यू हिल या गृहस्थाचे, ज्यांनी नो शेव नोव्हेंबरची सुरूवात केली त्यांचे आतड्याच्या कॅन्सरने निधन झाले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाने 'नो शेव नोव्हेंबर' ची अधिकृत स्थापना केली. हि संस्था कॅन्सरशी लढणाऱ्या रूग्णांसाठी काम करते.

' नो शेव नोव्हेंबर' प्रमाणेच ' मोव्हेंबर' हा पण शब्द नोव्हेंबर महिन्यात चर्चेत असतो. मोव्हेंबर हि आॅस्ट्रेलिअन संस्था पुरूषांच्या संपूर्ण आरोग्यविषयक गोष्टींवर जनजागृती करण्याचे काम करते. जसे की कॅन्सर, पुरूषांमध्ये आढळून येणार नैराश्य, पुरूषांच्या आत्महत्या. प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पुरूष मिशा वाढवून या मोहिमेत सहभाग दर्शवू शकतात.

या दोन्ही ट्रेंडचा मूळ उद्देश फक्त अन् फक्त पुरूषांच्या आरोग्याबद्दल जागृती निर्माण करणे हा आहे. कॅन्सर झालेला रूग्ण त्याचे केस गमावतो. अशा रूग्णांबद्दल आपुलकीची भावना दर्शवण्यासाठी हा ' नो शेव नोव्हेंबर' ट्रेंड चालवला जातो. महिनाभर रेझर बाजूला ठेवणे, सलूनला न जाणे, यातून जी बचत होईल ती कॅन्सर रूग्णांना मदत म्हणून देणे हा हि या ट्रेंडचाच एक भाग..

परिस्थितीमुळे दु:खी झालेल्या एखाद्या तरी चेहऱ्यावर, आपल्यामुळे सुखाचे एवडुसं जरी हसू उमललं, तर त्यासारखे दुसरे सुख ते कोणते? नाही का?

- सई मनोज देशमाने

Tags:    

Similar News