2021 चा पत्रकारीतेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या मारिया रेसा आणि डिमीट्रि मुरटोव कोण आहेत?

प्रामाणिक आणि निर्भय पत्रकारानी उत्सव करावा असा दिवस !;

Update: 2021-10-09 03:27 GMT

प्रामाणिक आणि निर्भय पत्रकारानी उत्सव करावा असा दिवस !

मारिया रेसा (Maria Ressa) आणि डिमीट्रि मुरटोव (Dimitry Muratov) यांना 2021 चा पत्रकारीतेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

मारिया रेसा फिलिपींन्स मधील मनीला इथे जन्माला आल्या व त्यांनी फिलिपींन्स आणि अमेरिकेत पत्रकारीता केली.

मायक्रोबायोलॉजी सोबत थिएटर आणि नृत्य यामध्ये पदवी घेतली होती. मात्र त्यांचा कल पत्रकारितेत असल्याने त्यांनी त्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. पत्रकाराने सत्य हे प्रामाणिक व निर्भयपणे लिहिले आणि बोलले पाहिजे यातत्वाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी संपूर्ण पत्रकारिता केली. यात अनेक भ्रष्ट राजकारणी, दहशतवादी यांच्या विरोधात अनेक वृत्त त्यांनी प्रकाशित केली, त्यावर पुस्तक लिहिली. इतकेच नव्हेतर फिलीपीन्स मधील राष्ट्र अध्यक्षच्या विरोधात निर्भयपणे वृत्त प्रसारित केल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा छळ करून त दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांच्यावर खटला भरण्यात येऊन 6 वर्ष 6 महिने जेल मध्ये डांबण्यात आले होते. यावेळी जगातील लोकशाहीवादी पत्रकारांनी पाठिंबा देत हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे सांगून त्यासंदर्भात आवाज उठवला.

पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी सदैव आवाज उठवण्यासोबत फेक न्युज च्या विरोधात मारिया काम करत होत्या जागतिक दहशतवाद यावर तिचा अभ्यास होता आणि त्याबाबत लिहून वेळोवेळी तिने त्यामागील सभ्य, राजकारणी आणि उद्योगपतीचे चेहरे समोर आणले. रप्पलर हे तिचे स्वताचे दैनिक होते, त्याच्या माध्यमातून तिने इतिहास रचला, मात्र यासोबत तिने सीएनएन या वृत्तवाहिनीत काम केले काही विद्यापीठात पत्रकारितेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्याचे काम केले.

पुरस्काराचे दुसरे मानकरी डीमैत्री मुरतोवं हे रशियन पत्रकार असून तत्वज्ञान याविषयात जरी त्यांनी पदवी घेतली असली तरी कॉलेज काळापासून त्यांना पत्रकारितेची आवड होती. पदवी नंतर त्यांनी सैन्यात 3 वर्ष काम केले त्यानंतर रशियातील राष्ट्रीय आणि लोकशाहीवादी वृत्तपत्र म्हणून त्यांनी नोवया गझेट आपल्या 50 पत्रकार मित्रांच्या सोबत वृत्तपत्र सुरू केले आणि थोड्या अवधीत ते खूप प्रसिद्धीस आले. चेचन्या येथील अत्याचार, मानवी हक्काचे उल्लंघन यावर त्यांनी अनेक लेख आणि रिपोर्ट्स छापल्याने भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट उद्योगपतींच्या रडार वर आले व त्यांनी मुरतोवं सह सोबतच्या सर्वच पत्रकारांना त्रास देण्यास सुरुवात केली, पत्रकार ऐकत नाही म्हटल्यावर त्यांचे खून करण्यात आले. यापद्धतीने आता पर्यंत सत्य छापणे आणि लोक जागृती साठी प्रयत्न करणारे 6 पत्रकारांची हत्या वेगवेगळ्या पद्धतीने केली गेली.

दोन्ही पत्रकारांनी सत्या साठी, मानवी हक्काचे संरक्षण, दहशतवादी, भ्रष्ट राजकारणी यांच्या विरोधात आपली पत्रकारिता वापरली त्यामुळे त्यांना प्रचंड छळ आणि त्यागातून जावे लागले. त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांचे सहकारी मारले गेले. मात्र त्यांनी हिम्मत नाही हारली, त्यांनी पत्रकारितेचे असिधारा व्रत अखंड पणे सुरू ठेवले त्यांना त्यांच्या या प्रवासात त्यांची हिम्मत वाढवणारे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि आज जगातील सर्वात मोठा आणि मानाचा असा नोबल शांती पुरस्कार 2021 जाहीर झाला.

जगातील सर्व छोट्या मोठ्या प्रामाणिक, निर्भयपणे पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकारांसाठी हा अभिमानाचा असा प्रेरणादायी दिवस आहे.

आपल्या भारत देशातील पत्रकारांनी जर या दोन पत्रकारांच्या आयुष्याचा प्रवास वाचला तर त्यांना प्रेरणा मिळू शकते, त्यातून भारतीय पत्रकारितेची नवी सुरुवात होऊ शकते अशी आशा आहे.

किरण सोनावणे,

मॅक्स महाराष्ट्र

9922666607

Tags:    

Similar News