वयाच्या ५० व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर खेळल्या पॉवरलिफ्टिंग ,स्वप्नांना वय नसतं
स्वप्नांना वयाची अट नसतेच मुळी ,हे पुन्हा एकदा Neeta Chaple यांनी सिद्ध केलं आहे. पण त्यासाठी त्यांनी कसा प्रवास केला ,संपूर्ण लेख वाचा त्यांच्याच शब्दात...
थोडंसं बोलायचं होतं....
बॅडमिंटन खेळतानाची पोस्ट टाकली आणि बऱ्याचं मित्र मैत्रिणींनी मला संपर्क साधला की,या वयातही मी इतकी सशक्त कशी? काहींनी तर मॅसेंजरला भांडावून सोडलं. अर्थात ते त्यांचं कुतूहल असावं! तुम्ही डाएट काय घेता? व्यायाम कोणता करायचा? प्रोटीन घेता का? आणखी हे पण की,तुम्हाला तुमच्या खेळात बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर आमच्याकडील हेल्थ ड्रिंक घ्या ह्यापेक्षा जास्त चांगला रिझल्ट मिळेल. अश्या बऱ्याचं प्रश्नांचा भडीमार होता. त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की, मी सुद्धा ओव्हर वेट आहे. त्याला भरपूर कारणे आहेत. परंतु निरोगी आहे. कुठेही दुखापत नाही, किंवा कोणतंही दुखणं नाही. ह्यामागे आहे ती प्रचंड मेहनत. सरावातलं सातत्य,सकस आहार आणि भरपूर झोप. सलग सात वर्ष क्रिकेट विकेटकीपर बॅट्सवूमन म्हणून. त्यामुळे बॅक स्ट्रॉंग आहे. 10 वर्ष संसारात रमले. स्वतःची क्रिकेट अकॅडेमी केली. कोच म्हणून पुन्हा मैदानात त्यामुळे सतत खेळासोबत नाळ जुळून होती. प्रारब्ध योग मलाही चुकले नाहीत रक्ताच्या नात्याला कायमची मुकले. पुन्हा नव्याने उभी राहिले लिखाण सुरु केलं. बापजन्मात कुणी वजन उचललं नसेल असा खेळ मोठ्या जिगराने खेळत आहे. तेही 49 व्या वर्षी सुरु केलं. स्नायूना वजन उचलायची सवय नाही म्हणून अक्वा वॉक सुरु केलं. म्हणजे स्विमिंग पूल मध्ये फक्त चालायची त्यामुळे पायाचे स्नायू अधिक बळकट झाले. त्याचा उपयोग वजन उचलायला झाला. राष्ट्रीय पातळीवर पॉवरलिफ्टिंग खेळले.
दिवाळीत वडिलांना ब्रेन स्ट्रोक त्यात तीन महीने वडील कोमात होते. वर्ष्याच्या सुरवातीलाच वडील गेले. त्यानंतर नितीनची तब्येत हे सगळं सांभाळत असतांना, मला पाहिजे तसा वेळ लिफ्टिंगला देता येतं नव्हता. परंतु मी थांबले नाही. स्विमिंग मध्ये सातत्य ठेवलं. स्विमिंग मुळे एक फायदा झाला. माझ्या दोन्ही हाताला फक्त अडीच बोटंमध्ये 2016 ऑक्टोबर पासून मुंग्या यायच्या, बोटं बधीर व्हायची. एका विशिष्ट स्थितीत ठेवल्यावर म्हणजे मोबाईल जास्त वेळ हातात पकडू शकत नव्हते. बाईक चालवणे. रात्री झोपतांना सुद्धा त्रास व्हायचा. डॉक्टरानी कारपेल टनेल इश्यू म्हणजे बोटांना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नसा असतात त्या कर्पेल टनेल हा बेल्ट असतो त्यामुळे नसा दबल्या जाऊन रक्तपुवठा बोटांपर्यंत पोहचत नाही. हे होण्याचं कारण मी डॉ. विचारलं तर त्यांचं उत्तर माझं वजन. हे उत्तर माझ्या पचणी पडलं नाही. डॉ. म्हणाले एक छोटीशी शस्त्रक्रिया आहे. तो बेल्ट कापायचा आणि नसा मोकळ्या करायच्या. परंतु मन काही केल्या मानत नव्हतं. फिसिओथेरपी साधारण दोन महिने घेतली. व्यायाम मात्र सातत्यानं सुरु होता. हे सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की फ्रिस्टाईल स्विमिंग मुळे माझा तो त्रास पूर्णपणे बरा झाला. डाव्या पायाचा लीगामेंट टेअर सुद्धा व्यायामाने बरा झाला.
तुम्ही जर का एकतास साधं चालत असाल तर 20 मिन. पाण्यात चालणे जास्त फायद्याचं आहे. त्यामुळे तुमचे पायाचे स्नायू मजबूत होतात. स्विमिन्ग केलं तर उत्तमच. आणि कुठलीही सुरवात कोणत्याही वयात होऊ शकते. माझ्या नणंदेच्या सासूबाई उत्तम पोहतात. त्यांचं वय 85 आहे. हे कारण सांगणाऱ्यांसाठी.
वयाचं कारण नको. मी 50 पूर्ण झाल्यावर सुरु केलं. चाळीशी नंतर प्रत्येकाने वेट ट्रेनिग करावे. माझा बाहेरच्या सप्लिमेंट पेक्षा वर्कआऊट वर जास्त जोर असतो. प्रोटीन म्हणजे नियमित अंडी खाते. नॉनव्हेज आठवड्यातून एकदा. वेट लॉस साठी हाई प्रोटीन डाएट. उकडलेली अंडी, कोबी, पालक ज्यूस. फायबर इनटेक जास्त ठेवते. बाहेरचं काहीही घेतं नाही हेल्थ ड्रिंक वगैरे.
जे काय करते ते प्रचंड उत्साह आणि आनंदाने करते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय कराल ते तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा ही विनंती. डाएट डॉ. ना विचारून घ्या. वेट ट्रेनिग ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीचं करा. माझा स्वतःच्या खांद्याचा टेंडन मसल टेअर झालेला . मसलवर जास्त ताण आल्याने. अप्पर बॉडी वर्कआऊट इंजुरी रिकव्हरी डॉ. ची ट्रीटमेंट आता बऱ्यापैकी रिकव्हर झालाय. माझा पूर्ण वर्कआऊट ट्रेनर करून घेतात. ट्रेनर चे पैसे वाचवायला जाऊन दुखापत करून घेऊ नका. आजची ट्रेनर मुलं मुली प्रचंड हुशार आहेत. चौकास बुद्धीचे आहेत. मला आयुष्यात कोच, जिम ट्रेनर उत्तम लाभले. माझं ध्येय हे त्यांचं ध्येय आहे.
खरी गरज आहे ती स्वतःला वेळ द्यायची. मनासारखं काही होतं नसेल तर दुप्पट मेहनत करते. जिम मध्ये गेलो की सर्व विसरतो. तिथे मी आणि मीच असतें. बाकी दुनियादारी नसते.
मध्यंतरी एक मैत्रीण भेटून गेली. तिने मला मेनोपाज बद्दल विचारलं. मूडस्विंग आणि काय? काय? मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, पिरियड्स खूप लवकर म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षी आलेत. परंतु पोट दुखणे, पाठ दुखणे हा प्रकार नव्हता. अगदी दर महिन्याला वेळेवर. जाताना सुद्धा काहीच त्रास नाही. दीडएक वर्ष झालं असेल मेनोपोज येऊन ह्या मागे काय कारण असेल नाही माहीत. खूप लाड, कोडकौतुक नाही झालेत लहानपणी. बाई, बेटा हा प्रकार नव्हता. दुखणं फुगणं वडिलांना आवडत नव्हतं. अवेळी झोपलेलं त्यांना आवडत नसे. बाळंतपणात सुद्धा त्यांनी झोपून मुलांना दूध पाजू दिलं नाही. रात्री सुद्धा उठून बसूनच दुध पाजायचं असा नियमच होता त्यांचा. बालपण धाकात आणि शिस्तीतं गेलं. लाड, कौतुक सासरी झालं.
आजच एका मित्रासोबत बोलतांना की ताप मला फक्त एकदा आला तोही मुलीच्या वेळी बाळंतपणात. तो म्हणाला आपण चुकून बाई झाला आहात. माझे आजोबा ही हेचं बोलायचे चुकून पोरगी झाली. हा तर माझा पहेलवान आहे. असो. कुणीतरी ह्यातलं थोडंफार आत्मसात केलं तर लिहणं सार्थकी लागेल. मनाने स्ट्रांग रहा. Be strong enough 💪💪
आता कसं जगायचं हे तुम्ही ठरवा ❤️❤️
खांद्यावर वजन घेताना सुद्धा आनंदी असतें तशी स्विमिंग टॅंक मध्ये सूर मारताना देखील तेवढीच आनंदी असतें. जे काय कराल ते मनापासून आणि आनंदाने करा. मस्त रहा स्वस्थ रहा.
Neeta Chaple