Myntra: हिलाच कसं असलं दिसलं?: सानिया भालेराव...

‘हिलाच कसं असलं दिसलं? ह्या बाईला फक्त, असंच दिसतं', पुरुषाला पण नाही दिसलं असलं काही' अशा शब्दात मिंत्राचा लोगो बदलावा म्हणून तक्रार करणाऱ्या नाझ पटेल यांना सोशल मीडियावर अशा शब्दात ट्रोल करण्यात काय लॉजिक आहे? वाचा सानिया भालेराव यांचं विश्लेषण;

Update: 2021-01-31 08:56 GMT

मिंत्रा (Myntra) हा जो ब्रँड आहे, त्याचा लोगो आक्षेपार्ह आहे. स्त्रियांचं objectification करणारा आहे, महिलांचा अपमान करणारा आहे अशी याचिका नाझ पटेल(Naz Patel), ज्या सोशल एक्टिव्हीस्ट आहेत. त्यांनी डिसेंबर महिन्यात पोलिसांकडे तक्रार केली होती. मुंबई सायबर पोलिसांनी मग मिंत्रा या कंपनीला ही तक्रार पाठवली आणि आता या ब्रॅंडने त्यांचा लोगो बदलला आहे.

या प्रकरणामध्ये दोन अत्यंत खेदजनक गोष्टी दिसल्या. एकतर ज्या महिलेने ही याचिका दाखल केली तिला फार ट्रोल केल्या जात आहे. म्हणजे "हिलाच कसं असलं दिसलं?" पासून ते "या बाईचं चारित्र्य कसं आहे" इथंपर्यंत.. म्हणजे शेवटी 'बाईला दिसलं हे असलं' इथेच गाडी येऊन थांबली..

दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीत्वाचा अनादर करणं. हे असं कोण्या एका चित्राने होण्याइतकं सोपं आहे का? Is Femininity centred around one body part? स्त्रीची इज्जत, अब्रू, मान सम्मान वगैरे तिच्या शरीरामधल्या एका अवयवावर अवलंबून आहे का?

आपल्या भावना इतक्या हलक्या गोष्टींमुळे आपण दुखावणार आहोत का? या ब्रॅंडने जो लोगोमध्ये बदल केला आहे. त्यात इतका मायनर बदल केला आहे आणि तो बदल अधिक अपमानस्पद आणि रिग्रेसिव्ह आहे खरं तर.. मी काही लोगो इथे देत बसणार नाहीये. कारण उगाचच मुद्दा बनवणं मला पटत नाही. पण जो बदल केला गेला तो अधिक जेंडर्ड आणि बॉडी सेन्ट्रीक वाटला.

भले ज्या स्त्रीला हा लोगो खटकला आणि तिने तक्रार केली. हे आपल्याला पटलं नसेल, पण तिच्या विरुद्ध सभ्य भाषेत बोलता येऊ नये. हे सुद्धा किती वाईट आहे.. ह्या बाईला फक्त 'असंच दिसतं', 'पुरुषाला पण नाही दिसलं असंलं काही' हे म्हणणं.. हे काय लॉजिक झालं का? आणि आपण सुद्धा किती कवटाळत रहायचं हे बाईपण?

कित्येक लोगो आहेत. जे पुरुषांसाठी सुध्दा अपमानकारक असू शकतात मग.. जर पुरुषपण नसेल अफेक्ट होत असल्या चित्रांनी तर मग स्त्रीत्व का व्हावं? का आपण एका उंचीवर नेऊन ठेऊ शकत नाही बाईपणाला? का इतकं हलकं, हळवं, स्वस्त होऊ द्यायचं बाईच्या सो कॉल्ड अब्रूला, मानाला?

माझं बाईपण इतकं हलकं नक्कीच नाही.. मी माझ्या माणुसपणाचं पारडं जड करणार.. निदान पुढच्या पिढीतल्या मुलींचं बाईपण हे अनॅटॉमीकल फीचर्सशी निगडित राहू नये. हा आशावाद कायम आहे..

- सानिया भालेराव

Tags:    

Similar News