अनेकवेळा आपण आपल्या अवतीभोवती ‘‘बाईच्या जातीला हेच कराव लागत’’ तसेच ‘‘तू मुलगी आहेस तूला हे करावचं लागेल’’ असे वाक्य ऐकलेच असतील पण तू मुलगी आहेस म्हणून तूला हे कराव लागेल असं म्हणताना लोकांना स्त्रीशक्तीचा विसर पडतो की काय? असा प्रश्न आजही विचार करायला लावल्याशिवाय राहत नाही.
आजच्या काळात समाजात एकीकडे स्त्री-पुरुष समानता असल्याचे म्हटले जाते, तर दुसरीकडे याच समाजात प्रत्येक स्त्रीला तिच्या स्त्रीपणाची जाणीव करून दिली जाते, अर्थात स्त्री-पुरुष समानता ही गोष्ट समाजाने फक्त कायद्यापुरतीच स्वीकारली आहे असे म्हणणे नक्कीच चुकीचे ठरणार नाही.
आजच्या काळातही स्त्रीला नोकरी करायची असेल तर तिला नोकरीसोबत घरातील जबाबदाऱ्याही योग्यरितीने पार पाडता आल्या पाहिजेत तसेच स्त्रीला स्वयंपाक उत्तमच करता आला पाहिजे आणि स्त्रीने निश्चित वेळेतच नोकरी केली पाहिजे, अशा गोष्टी स्त्रियांना मागे खेचतात मात्र तरीही या गोष्टींसोबतच प्रत्येक स्त्री आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते.
आजच्या युगात स्त्रियांच्या यशस्वी भरारीची अनेक उदाहरणे असतानाही समाजात स्त्रियांना कमी लेखले जाते, पण प्रत्येक स्त्री पुरुषांनाही पेलावणार नाही अशा आपल्या अनेक जबाबदाऱ्या आपले कर्तव्य समजून पार पाडते तसेच तिने केलेला निश्चय, तिची जिद्द आणि तिने ठरवलेले ध्येय पुरुषांनाही मागे टाकेल असे असते, तरीदेखील या समाजात स्त्रियांचा अपमान केला जातो, मात्र ‘ती’चं स्त्रीपण हे तिची दुर्बलता नसून तिची ताकत आहे हे लक्षात घेऊन समाजाने प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे.
काजल जाधव