स्त्रियांची अंतर्वस्त्रे उघड्यावर वाळत घालणे चुकीचे आहे का ?
आजही स्त्रियांची अंतर्वस्त्र म्हंटल कि लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे. महिलांना अंतर्वस्त्र खरेदी करण्यापासून ते अगदी वाळत टाकण्यापर्यंत अनेक गोष्टींवर बंधने असतात. अंतर्वस्त्रे Woman underwear उघड्यावर वाळत घालणे चुकीचे आहे का? याविषयी कोणीच उघडपणे बोलत नाही पण काही दिवसांपूर्वी सई मनोज यांनी याविषयी एक लेख लिहिला होता तो पुन्हा प्रकाशित करीत आहोत...
हल्ली एक काका सोशल मिडियावर(social media) स्त्रियांबद्दल जे मनाला येईल ते बोलत आहेत. स्त्रीचं वागण कसं असावं, स्त्रीने कसे कपडे घालावे, स्त्रीने रस्त्यावर नाचणे कसे चुकीचे... इतकचं काय तर स्त्रीने तिची अंतर्वस्त्रे Woman underwear उघड्यावर वाळत घालणे कसे चुकीचे ह्यावरही बोलण्यापासून काका स्वत:ला अडवू शकत नाहीयेत.. !
स्त्रियांच्या उघड्यावर वाळत घातलेल्या अंतर्वस्त्रांचा Woman underwear काकांना प्रचंड प्रॉब्लेम आहे. का तर म्हणे, अशी उघड्यावर लटकलेली स्त्री ची अंतर्वस्त्रे पाहून पुरूषांच्या भावना men sexual Feelings rise उफाळू शकतात. का ओ काका? पुरूषांच्या वेगवेगळ्या शेपच्या, डिझाईनच्या अंडरपॅंट, बनियन्स उघड्यावरच वाळत असतात की वाऱ्यावर झुलत... ते पाहून स्त्रियांच्या भावना बऱ्या चाळवत नाहीत ते?
सेक्शुअल फिलिंगस् स्त्रियांनाही (Woman sexual Feelings) असतातच की... इनफॅक्ट पुरूषांपेक्षा जास्तच असतात. मग तरीही स्त्रिया तुम्हा पुरूषांची अंतर्वस्त्रे पाहून का ओ कामातुर होत नाहीत??
पुरूषांचा पुरूषार्थ स्त्रीवर तुटून पडण्यात, खूप साऱ्या स्त्रियांबद्दल आसक्ती ठेवण्यात असतो. पुरूष तसाच वागणार नं, स्त्रीने सांभाळून वागावं, स्वत:च शील जपावं ही तुमची सडकी विचारधारा स्वत:जवळच ठेवा. स्त्रीचा कोणत्याही कपड्यातला देह वरून खालून वासनेच्या नजरेने पाहणारे, मनातल्या मनात, तर कधी खरा खुरा बलात्कार करणारे काही पुरूष, स्त्रीची अंतर्वस्त्रे पाहून सुध्दा वासनांध होतात म्हणजे अवघडच आहे नाही का?
आम्ही स्त्रियांनी कसं वागावं, काय घालावं हे तुम्ही पुरूषांनी नाही सांगायच बरं का.. आधीच्या काळात स्त्रिया पडद्यात राहत असत. स्वत:ची अंतर्वस्त्रेही अंधाऱ्या, दमट कोणाच्या नजरेस पडू नयेत अशा ठिकाणी वाळवत घालत.. स्त्रिया आपले शरीर, आपली मते, आपले आतले कपडे सगळच काही लपवून, बंद करून ठेवत असत. पण गेले बरं का काका… आता ते दिवस…
कोणतेही कपडे उन्हात वाळवल्यावर ते बऱ्यापैकी निर्जंतुक होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशींपासून कपड्याचे रक्षण होते. कपड्यांना मोकळा वाराही लागणे गरजेचे असते. अंतर्वस्त्रांना तर ही उन्हाची आणि वारा लागण्याची गरज जास्त असते, मग ती स्त्री ची असोत वा पुरूषाची..
तसंही अंतर्वस्त्रे पाहून भावना उफाळत असतील तर घरातल्या सर्व पुरूषांनी आपल्या अंडरपॅंटस स्वत: धुवून वाळत घालाव्यात. कारण ते पाहून स्त्रीच्या भावना उफाळल्या तर काय करायचं नाही का काका?
नियम सगळ्यांनाच सारखे... स्त्री असो वा पुरूष.. तुमचे एककल्ली विचार स्वत:जवळच ठेवा.. फालतू सल्ले नकोत..
सुधरा..!!
सई मनोज