सेक्स आणि...
वेश्या... सेक्स वर्कर कोणतीही महिला हे काम आनंदाने करत नाही. तिला हे काम करण्यासाठी परिस्थिती भाग पाडते. नुकताच आंतरराष्ट्रीय सेक्सवर्कर डे साजरा करण्यात आला. या सेक्सवर्कर डे संदर्भात संदीप काळे यांनी सेक्सवर्कर डे का साजरा केला जातो? आपल्या देशातील सेक्सवर्करची काय स्थिती आहे. यावर टाकलेला प्रकाश...;
रळ मार्गाने जगावे असेच वाटते. त्यात स्त्री अपवाद कशी असेल. स्त्री हा आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक स्त्रीला वाटते, आपले जीवन साधे आणि सरळ मार्गी असले पाहिजे. शिकून, नोकरी करून छानपैकी संस्कारीत आयुष्य असावे असे वाटणे अगदी साहजिक आहे. आपले लग्न व्हावे, यासारखे असंख्य स्वप्नं मुलींचे असतात. परंतु, प्रत्येकच मुलींचे स्वप्नं पूर्ण होतील असे नाही. परिस्तिथी समोर त्यांना झुकावेच लागते. पाहिलेले स्वप्न स्वप्नच राहतात नाहीतर अल्पावधीतच बेचिराख होतात.
परवाच जागतिक सेक्स वर्कर्स दिवस साजरा झाला. अनेकदा प्रश्न पडतो हा दिवस सेक्स वर्कर्स (Sex Worker Woman) काम करणार्या महिलांनी खरंच साजरा करायला पाहिजे का? देश विदेशात हा दिवस महिला रस्त्यावर उतरून साजरा करतात. खरंच याला आंतराष्ट्रीय पातळीवर महत्त्व द्यायला हवे का? जागतिक, राष्ट्रीय, स्थानिक सगळ्याच ठिकाणी हा विषय सध्या मोठा होत चालला आहे. महिलांच्या आयुष्यातील हा अतिशय खासगी विषय आहे, परंतु हा विषय मात्र सेक्स वर्कर्स म्हणून काम करणार्या महिलांच्या दृष्टिकोनातून फार वेगळा आहे.
भ्रमंती LIVE च्या निमित्ताने मी अनेकदा या महिलांशी बोललो आहे. प्रत्येक महिलेची कहाणी वेगवेगळी आहे, आणि त्यामागची पार्श्वभूमी सुद्धा. कुठलीही महिला आपले शरीर स्वतःहून विकायला तयार नसते, तर खुपदा यामागे तिची परिस्थिती असते. माणसाला परिस्तिथी खुपदा मजबूर करत असते आणि त्यातूनच माणूस मग अनेकदा ते ही कामे करायला लागतो, जे त्याला कधीच करायचे नसतात.
सेक्स वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. ह्या, महिलांच्या ठिकाणी स्वतःला ठेऊन पाहिले की, खरंच येणाऱ्या प्रत्येक दिवसाला ह्या कशा सामोऱ्या जात असतील, हा प्रश्न मनात येतो.
आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर्स दिवस, हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे, लैंगिक कामगारांच्या हक्कांची जाणीव त्यांना करून देणे होय. जेणेकरून, ते लोक सुद्धा इतर लोकांप्रमाणेच सन्मानीय जीवन जगले पाहिजेत.
हा दिवस साजरा करण्याचे खरे कारण म्हणजे, 1970 च्या दशकामध्ये फ्रान्स मधील पोलिसांनी काही सेक्स वर्कर्सना गुप्तपणे काम करण्यास भाग पाडले. याचाच अर्थ असा होता की, पुर्वी पेक्षा जास्त गुप्तपणाने काम त्यांना करावे लागत होते. त्यानंतर सेक्स वर्कर्स म्हणून काम करणार्यांची सुरक्षा कमी झाली आणि त्यांच्यावर पुर्वीपेक्षा जास्त हिंसाचार केला. हे सगळे सहन न झाल्यामुळे आणि अमानुषपणे केल्या जाणार्या या परिस्तिथीवर लक्ष वेधून घेण्यासाठी 1975 मध्ये 2 जून या तारखेला 100 सेक्स वर्कर्सनी फ्रांसच्या ल्योन मध्ये सेंट-निज़ियर चर्च वर कब्जा केला आणि सगळ्यांनी उपोषण सुरू केले.
त्यांनंतर सेक्स वर्कर्सनी सरकार समोर आपले मुद्दे मांडले आणि आपला राग व्यक्त केला. सरकार बद्दल राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. परंतु, त्यांना कुणाकडून कुठलाही पाठींबा मिळाला नाही आणि त्यामुळे ल्योन मध्ये सेंट-निज़ियर चर्च वर पोलिसांनी 10 जूनला हल्ला केला आणि त्यानंतर सुमारे आठ दिवसांनी सेक्स वर्कर्सनी चर्च खाली केले. परंतु, पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामुळे या मोहिमेंने मोठे रूप धारण केले. आणि, त्यानंतर एक चळवळ उभी राहिली आणि ही चळवळ फ्रान्स मधून संपूर्ण राष्ट्रांत पोहचली. तेंव्हापासून 2 जून हा आंतराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस (सेक्स वर्कर्स डे) साजरा केला जातो.
भारतात सुद्धा सेक्स वर्कर्स म्हणून काम करणाऱ्यांची संख्या 6,37,500 इतकी आहे. हा आकडा, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) यांनी दिलेला आहे. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टंसिंगमुळे यांच्या कामावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणचे रेड लाईट एरिया शांत झाले आहेत. त्यांचे भविष्य अंधारात आहे.
सेक्स वर्कर्स म्हणून काम करणार्या महिलांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. त्यांच्या समस्या, त्यांचे भविष्य सगळे काही अंधारात आहे. आजही, यांची संख्या कधीही आपल्याला कमी झालेली दिसत नाही, तर ती वाढतच आहे. महाराष्ट्र सुद्धा रेड लाईट एरियानी खचाखच भरलेला आहे. मुंबई मधील कामाठीपुरा, पुण्यातील बुधवार पेठ, असे असंख्य नावे आहेत. शहरात, खेड्यात, गल्लीत सगळीकडे आपल्याला हे चित्र दिसते. सेक्स वर्कर्स म्हणून काम करणार्या महिलांमध्ये अगदी वय वर्षे 8 पासून ते वय वर्षे 82 पर्यंत काम करणार्या महिला आहेत. अनेकदा या महिलांचे स्वतःच्या कामाबद्दल जाणून घेतले तर, त्यांना आपले काम हे कामच वाटते.
खरंतर, माणूस उदरनिर्वाह करण्यासाठी परिस्थिती त्याला कुठल्या मार्गाने नेईल काही सांगता येत नाही. सेक्स वर्कर्स म्हणून काम करणार्या महिला ह्या काम करतातच. पण, ही व्यवस्था किती दिवस चालू राहणार आहे? यामध्ये शरीर विकणारे आहेत म्हणून शरीर विकत घेतात आणि शरीर विकत घेणारे आहेत म्हणून शरीर विकणारे आहेत. शेकडो वर्षापासुन हा प्रश्न आहे. सेक्स वर्कर्स म्हणून काम करणार्यांना पर्यायी काम दिले आणि त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणले तर...?
संदीप काळे
9890098868