जर हे एन्काऊंटर योग्य होतं असं वाटतं असेल, तर पोलीस कोठडीत मरणारे आरोपी हे ही पोलिसांचं कृत्य मग तुमच्यामते योग्यच म्हणायचं.
एन्काऊंटर हे उत्तर असेल मग कशाला गरज आहे न्यायव्यवस्थेची? न्यायालयांची आणि न्यायाधीशांची?
प्रत्येक खटले अशा पोलिसांनी आणि त्यांना समर्थन करणाऱ्यांनीच निकाली काढा.
जेव्हा तुमच्या एखाद्या चुकीला पोलीस त्यांच्या 'style' मध्ये तुम्हाला उत्तर देतील तेव्हा कदाचित तुम्हाला कायदा आठवेल, कळेल. तेव्हा कदाचित मानवाधिकार म्हणजे काय हे जाणून घ्यावासं वाटेल.