कोरोना काळामध्ये अनेकांनी आपल्या जवळचे माणसं गमावली. कोरोनामध्ये अनेक लोक बेरोजगार झाले. अनेकांच्या हातची कामं गेल्यानं मानसिक आणि आर्थिक दडपण वाढलं. मात्र या सगळ्यांमध्ये बचत गटातील संघर्षशील महिलांनी संकट हीच संधी मानत रोजगारांची निर्मिती केली. मात्र सर्वच महिलांना बचत गटातील महिलांप्रमाणे छोटा मोठा रोजगार मिळाला नाही. त्यामुळे जगभरातील संघटित आणि असंघटित महिला कामगारासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर नक्की उपाय काय? जगभरातील महिला कामगारांची सद्यस्थिती काय आहे? या संदर्भात महिला अभ्यासक रेणुका कड यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा..