लहान असताना नव्हे चक्क ११ वी पर्यंत आम्हाला हे 'कावळा शिवला' की स्त्रिया बाहेर बसत असतात असा समज होता. कारण आम्हाला लहानपणापासून सांगितलं जायचं... कावळा शिवलाय म्हणून विंटाळ झालाय... पण अधुन-मधुन मनाला प्रश्नही पडत, असा कावळा बरा यांनाच नेहमी नेहमी शिवतो राव....! आपल्याला तर कावळ्याने एकदाही शिवले नाही. अकरावीला थोडी समज आली आणि ते जीवशास्त्र समजल. एकदा क्रिकेटचा सामना पाहत बसलो होतो.
त्याकाळी नवीन दूरदर्शनवर सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात असायची... पण ती नेमकी कशाची जाहिरात आहे कळायचे नाही. ब-याच जणांना त्यात अप्रत्यक्ष गाण्यातून सांगितले जायचे. आणि गाणेही खूप सुरावटीत असायचे ' चुप क्यूं बैठी हो जरुर कोई बात है' आणि हे गाण आमचा मित्र अगदी चित्रपटाच्या गाण्यासारखे मोठ्यानी म्हणायचा. समजून म्हटला असता तर, म्हटलाच नसता कारण तो काळच खूप तसा संकुचित होता. ( आता थोडा सैल झालाय एवढेच )
एकदा मी त्याला ते गाणे कशासंदर्भात आहे हे सांगितल्यास त्यांनी जिभ चावून घेतली. ग्रामीण भागातील महिलांच्या दृष्टीने ( मी सामाजिक म्हणत नाही ) सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो पाच दिवसांचा काळ स्वयंपाक घरातून सुट्टी, त्या ढोर मेहनतीतून निदान हे पाच दिवस या ट्याबुमुळे तरी सुटी मिळायची.
हे ही वाचा...
ब्रिटिश राजघराण्यातील बंडखोर ‘प्रिन्सेस डायना’
काकूंचा व्हिडीओ व्हायरल पण यात दोष कुणाचा?
COVID-19 ची बाधा झालेल्या डॉक्टरांना राखीव बेड का नाही?
COVID-19 ची बाधा झालेल्या डॉक्टरांना राखीव बेड का नाही?
जसजसा मोठा होत गेलो, वाचत गेलो. यातला फोलपणा समजत गेला. प्राचीन काळातील मातृका अन मातृसत्ताकता समजली. शैवातला शाक्त हा मातृदेवताला भजणारा होता. कृषी परंपरेच्या आद्य वाहक ते कुलाचारांचे नावही तिच्यावरुन ठेवले जात होते, जसे मुरा चे मौर्य झाले, गौतमी चा पुत्र गौतमीपुत्र सातकर्णी म्हणून ओळखला जात... असे अनेक उदाहरणांनी स्त्रीचे प्राचीन सामर्थ्य कळले. तिचे नैसर्गिक सामर्थ्य ( बौध्दीकसह सर्व ) अधिक असल्यामुळेच तिच्या पेक्षा वयानी अधिक मोठ्या पुरुषाशी लग्न व्हायचे. ( संदर्भ : वि. का. राजवाडे यांचा विवाह संस्थेचा इतिहास ) तिच्या मासिम पाळीला पावित्र्याच्या संकल्पनेशी जोडण्याचा काळ कधी सुरु झाला त्याचे संदर्भ नाहीत... पण दुसऱ्या शतकापासून भारतीय समाज अधिक देवभोळा झाला याला संदर्भ आहेत.
असो ... मुद्दा हा आहे मासिक पाळीचा अन् त्यावर एकविसाव्या शतकात हेल्थ हायजिनकच्या काळातही शेकडो महिलांना जंतुप्रादुर्भाव होवून प्राणास मुकावे लागल्याचे मी मेळघाटच्या डॉ. आशिष सातव यांच्या आणि डॉ. कोल्हें यांच्या बरोबरच्या सुन्न करणाऱ्या चर्चेतून असे प्रकरण ऐकले आहेत. आजच मी ( पिक्चर जुना झाला ) ट्विंकल खन्ना या एकेकाळच्या कलावंत आणि आजच्या संवेदनशील लेखिकेकडून पती अक्षय कुमार सोबतीन काढलेला Pad Man पाहिला. त्यानिमित्ताने हा सगळा पट आठवला.... मुरुगनची लढाई आणि त्याची जिद्द असलेली प्रेरणादायी कथा अक्षयनी खूप ताकदीने पेलली आहे. डाक्युमेंटरी किंवा डाक्युड्रामाच्या विषयावर एक यशस्वी फिचर फिल्म काढून या चळवळीला मोठ बळ दिल आहे.... !! ट्विंकल, अक्षय आणि नेहमीच उत्तोत्तम कलाकृत्ती देणाऱ्या आर. बाल्की यांचेही खूप खूप आभार ...... !!