I am papa's Daughter : दिशाच्या वडील प्रकाश झा यांना फ्रंट सीटवरून आगळ्यावेगळ्या शुभेच्छा
ही छोटीशी कहाणी आहे आपल्या वाईट काळातही करियरला कायम बॅक सीटवर ठेवून मुलीला फ्रंट सीटवर ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रकाश झा यांची... मुलगी दिशा झा आणि प्रकाश झा यांच्यामधील नात्यांमधील एका आगळ्या वेगळ्या जिव्हाळ्याची... वाचा फादर्स डे निमित्त पूजा सामंत यांनी दिशा झा यांची घेतलेली मुलाखत
मेरे पापा और मम्मी की उपलब्धियों पर हमेशा से मुझे बडा फख्र रहा है ! आय एम् पापाज डॉटर, त्यांच्या अधिक जवळ आहे. मी परंतु मला ह्या दोघांनी वाढवलं. मी सध्या निर्माती –कॉस्ट्युम डिझायनर म्हणून आपलं बस्तान बसवतेय. माझ्या बॅनरचे नाव 'पेन, पेपर्स, सीझर्स एंटरटेनमेंट'. अर्थात कागदावर पेनाने लिहिलेली कथा, निर्मिती आणि मग कात्री म्हणजे संकलन! अर्थात एडिटिंग! माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व फुलवण्यास माझ्या आई-वडिलांनी मदत केलीये.
बाबांच्या 'राजनीती' ह्या फिल्मपासून मी त्यांना असिस्ट करू लागले. निर्मिती-कथा आणि दिग्दर्शन यात मी साहाय्य करत असे. बऱ्याचदा काम संपले की मी माझ्या शंका -अडचणी त्यांना विचारत असे. माझे वडील मला लाडाने 'बेबो' म्हणतात तर आई गुची म्हणते मला. माझ्या वडिलांना मी बाबा संबोधित करते तर आईला मम्मी म्हणते. बाबांचं वैशिष्ट्य म्हणजे माझं चुकलं तरी ते माझ्यावर कधीही रागावत नाहीत. थोडा वेळ गप्पच बसतात!
त्यांचं ते अबोल राहणं मात्र, मला सहन होत नाही…! माझं जिथे चुकतं तिथे त्यांनी मला ओरडावं, रागवावं, पण गप्प बसू नये !
बाबांच्या फिल्मचे शूटिंग जिथे असेल तिथे मी आणि मम्मी भेट देतो, तिघेही क्वालिटी टाइम एकमेकांसोबत घालवतो.. २०२० चा वर्षारंभ आम्ही तिघांनी एकत्र लखनऊ केला. बाबांच्या फिल्मचे शूटिंग ह्या; नवाब नगरीत चालू होते!
खरं म्हणजे माझ्यावर संस्कार घडवण्यात ह्या दोघांनी आपला सहभाग दिला. पण बाबांचे कौतुक यासाठी वाटते की मी पाचगणीला शिक्षणासाठी असताना ते मुंबईहून पूर्ण ७-८ तास सलग ड्राइव्ह करत मला भेटायला अगदी न चुकता येत असत!
त्या काळात मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील झाला नव्हता! मला खाऊ, खेळणी घेऊन येत, पुन्हा दुसऱ्या दिवशी तितकाच प्रवास करून मुंबईला निघत, तो त्यांच्या अथक परिश्रमाचा, संघर्षाचा काळ होता! पण आपलं करियर कायम बॅक सीटवर ठेवून मला त्यांनी फ्रंट सीटवर अर्थात मला नेहमी प्राध्यान दिलं! अशा बाबांची मुलगी म्हणून मला त्यांचा सदैव अभिमानच वाटेल!
(मनोरंजन विश्वातल्या ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी फादर्स डेच्या निमित्ताने फिल्म निर्माती दिशा झा यांची मुलाखत घेतली.)