पालकांनो, तुमची टीनएजर्स मुलं सध्या काय करतायेत?
तुमची मुलं मोबाईलवर काय काय पाहतात हे बघण तुमच कर्तव्य नाही का? नशेच्या नादी आपली मुलं लागली आहेत का हे बघणं तुमचं कर्तव्य नाही का? मायानगरी असलेल्या दुनियेत तुमची मुलं सध्या काय करतायेत? टीनएजर्सच्या पालकांना आनंद शितोळे यांनी विचारलेले प्रश्न... नक्की वाचा;
ते सध्या काय करतात ?
प्रश्न आजच्या टीनएजर्सच्या आईबापांना आहे, असे आईबाप ज्यांनी १९९० नंतरच्या आर्थिक उदारीकरणाची फळ चाखली, ज्यांनी त्यांच्या पालकांच्या तुलनेत प्रगतीचा, समृद्धीचा वेग जास्त अनुभवला. ज्यांनी या सुबत्तेमधून आज आपल्या पाल्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या आणि टीनएजर्स अपत्य असलेल्या सगळ्यांना हा प्रश्न आहे.
सगळेच नाही पण काहीजण चुकले त्यावेळी, प्रचाराला, वाहिन्यांच्या गदारोळाला, सर्कशीला आंदोलन समजण्याच्या चुकीने हे तत्कालीन युवक चुकलेही असतील, आज त्यांना त्याचा कदाचित पश्चाताप होत असेलही, मात्र पालकांनी केलेली चूक मुलांनी करू नये एवढी काळजी घेणे आपल कर्तव्य नाही का ?
हे तरुण मुलं काही अवांतर वाचतात का? वाचत असतील तर काय वाचतात? यांच्या पालकांच्या पिढीने मनोरंजन म्हणून दूरदर्शनचे कार्यक्रम, पुस्तक, नाटक, चित्रपट पाहिले त्यांच्या मुलांना मोबाईलवर अफाट खजिना उपलब्ध आहे. म्हणूनच त्यामधून हे अवांतर वाचतात का आणि काय वाचतात ते तपासून पहा.
या मुलांच्या कळत्या वयात भवताली द्वेषप्रेम, द्वेषभक्ती, कुणीतरी दृश्य अदृश्य शत्रू आपल्या ऱ्हासाला कारणीभूत आहे हे पटवून देणारे खूप आहेत. माध्यम, न्यूजवाहिन्या सगळे हेच करताहेत, मालिकांचं विश्व हेच दाखवत आहे. सकारात्मक काही पाहायला मिळणे त्यांना दुर्मिळ झालेले असेल तर ते या मोबाईलवर काय काय पाहतात हे बघण तुमच कर्तव्य नाही का ?
नशा कुठलीही वाईट, तीच समर्थन कुणीही करणार नाही पण हि द्वेषाची, धर्माची अफू सगळ्यात वाईट आणि भयंकर, इतर कुठल्याही व्यसनाची नशा ठराविक काळाने उतरते, मात्र हि द्वेषाची नशा दिवसेंदिवस माणसाला अजून खड्ड्यात घालते, अश्या नशेच्या नादी आपली अपत्य लागली आहेत का हे बघण तुमचं कर्तव्य नाही का ?
कधीकाळी हा देश सोनेकि चिडिया होता हे ठासून सांगितल जात पण सध्याच्या काळातली आपली वाटचाल हि चिडिया कापून खाऊन नाहीतर विकून पोट भरणारी आहे, अशा अवस्थेत आकुंचन पावणाऱ्या संधी, मर्यादित पर्याय हे माणसांची चिडचिड वाढवतात, गळेकापू स्पर्धा दमछाक करते अशावेळी कुणीतरी आपल्या दुरावस्थेला जबाबदार आहे असं म्हणून कुणाच्या माथ्यावर खापर फोडणं सोपं असत. या द्वेषाच्या सापळ्यात आपली मुल अडकत आहेत का हे पाहण आपल कर्तव्य नाही का ?
ते सध्या काय करत आहेत यावर २०२४ मध्ये हे फर्स्टटाईम व्होटर्स म्हणून चुचकारून, त्यांना आपल्या वळचणीला आणून कुणीतरी पुन्हा द्वेषाचे मळे फुलवणार असेल तर, २०२४ ला त्यांनी नेमकं काय कराव हे बघण, त्यांना सल्ला देण, त्यांची वाटचाल योग्य मार्गावर आहे, योग्य दिशेने आहे हे पाहण आपल कर्तव्य नाही का ?
म्हणूनच ते सध्या काय करतात हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना आपल्या अपत्यांच्या बद्दल स्वतःच्या मनाला विचारण गरजेच आहे.
#बखर_लोकशाहीची
#तेसध्याकाय_करतात
#बालक_पालक
आनंद शितोळे
(लेखका फेसबुकवर चालू घडामोडींवर आपले मत मांडत असतात.)